आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Fire In The American Colonies; Homes Left By One Million People, 6600 Acres Of Forest Land In Orange County

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्नितांडव:अमेरिकेतील वसाहतींमध्ये वणवा; एक लाख लोकांनी सोडली घरेदारे, ऑरेंज कौंटीमध्ये 6600 एकर वनक्षेत्र खाक

सॅक्रामेंटोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 40 लाख एकरांवरील जंगल वणव्याच्या भक्ष्यस्थानी, 3.4 कोटी लोकांसाठी रेड अलर्ट, 32 जणांचा मृत्यू

अमेरिकी राज्य कॅलिफोर्निया वणव्याचा मुकाबला करत आहे. सुमारे ४ कोटी लोकसंख्येच्या राज्यात २२ ठिकाणी मोठा वणवा लागला आहे. ही आग विझवण्यासाठी ४ हजारांवर अग्निशामक दलाचे जवान रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मंगळवारी येथील आग वनक्षेत्रातून ऑरेंज कौंटीच्या वसाहतीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे एक लाख लोकांना घर सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. बुधवारपर्यंत ४० हजारांवर लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते. इतर लोकांना लवकरच घरेदारे सोडावी लागतील.

सुइसून अग्निशमन दलाचे प्रमुख जस्टिन विन्सेंट म्हणाले, ऑरेंज कौंटीमध्ये आतापर्यंत ६६०० एकर जंगल उद्ध्वस्त झाले आहे. येथे ताशी ६५ ते ७० किमी वेगाने वारे वाहू लागले आहे.

त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. वास्तविक येथे ७०० अग्निशमन दलाचे जवान व विमानांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

३.४ कोटी लोकांसाठी रेड अलर्ट, ३२ जणांचा मृत्यू

कॅलिफोर्नियाच्या अग्निशमन संस्था कॅल फायरच्या मते, राज्यात आतापर्यंत ४० लाख एकरांवरील जंगल वणव्याच्या भक्ष्यस्थानी आले आहे. आतापर्यंत ३२ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. सुमारे ४ कोटी लोकसंख्येच्या कॅलिफोर्नियात ३.४ कोटी लोकांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.