आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्नितांडव:कॅलिफोर्नियात वाइन कौंटीमध्ये 3 जणांचा मृत्यू, अमेरिका, ब्राझील आणि पॅराग्वे आगीने उद्ध्वस्त

वॉशिंग्टन / ब्राझिलियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र कॅलिफोर्नियातील सेंट हेलेनाचे आहे. येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून घर खाक झाले.

अमेरिका, ब्राझील, पॅराग्वे या जगातील तीन देशांना जागतिक महामारीच्या काळात वणव्याचाही सामना करावा लागत आहे. अमेरिकेत महिनाभरापासून वणवा लागला आहे. ही आग १२ राज्यांतील १०० हून जास्त वनक्षेत्रात पसरली आहे. मंगळवारी उत्तर कॅलिफॉर्नियाच्या वाइन कौंटीत आग भडकली. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे ७० हजार लोकांना आतापर्यंत वाचवण्यात यश मिळाले आहे. आगीच्या भीतीने ओरेगनमधील पाच लाख लोकांनी घरेदारे सोडली आहेत. अग्निशमन दलाचे प्रमुख बेन निकोल्स म्हणाले, १५ हजारांहून जास्त जवान आगीवर नियंत्रणासाठी अहोरात्र झटत आहेत. हेलिकॉप्टर व विमानांचीदेखील त्यासाठी मदत घेतली आहे. अॅशलँडचे पोलिस प्रमुख टिघे आे मिएरा म्हणाले, कॅलिफोर्नियात आगीमुळे १० लाखांहून जास्त एकर क्षेत्र खाक झाले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील भागात वारे ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे आग आणखी पसरू लागली आहे.

ब्राझील : जनावरांचा कोळसा

ब्राझीलच्या पेंटानल जंगलातील वणव्याने कहर केला. या आगीत शेकडो जनावरांचा कोळसा झाला. ब्राझीलमध्ये जगातील सर्वात मोठे वनक्षेत्र आहे. परंतु भयंकर आगीमुळे येथील जमिनीचा ओलावा नष्ट झाला. ब्राझीलमध्ये पसरलेली आग पॅराग्वेपर्यंत धडकली.

पॅराग्वे : राजधानीच्या आकाशात धूर

पॅराग्वेमध्ये शनिवारी वणवा पसरला. त्याचा धूर राजधानीच्या आकाशात पसरला होता. स्थानिक मीडियाच्या म्हणण्यानुसार ही आग ब्राझीलमधून येथे आली आहे. बुधवारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे सांगण्यात येते. ही आग नियंत्रणात आली नाही तर ती बोलिव्हियापर्यंत जाऊ शकते.

संशोधन : आगीमुळे हवा विषारी

अमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे हवा विषारी झाली आहे. आगीमुळे हवा दूषित झाली आहे. त्यामुळे श्वासोच्छ‌्वास घेणे कठीण बनले आहे. बुधवारी यासंबंधी एक संशोधन जारी झाले. ह्यूमन राइट्स वॉच व ब्राझीलच्या अॅमेझॉन एनव्हॉयर्नमेंट रिसर्च इन्स्टिट्यूटने हे संशोधन जाहीर केले. त्यानुसार यंदाचा डेटा वनांच्या होत असलेल्या कत्तलीबद्दल चिंता व्यक्त करणारा आहे