आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Fire Speed 6 Thousand Acres Per Hour, One Lakh Acres Burn At Night; The Largest Fire Break In Colorado's History

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत अग्नितांडव:वणव्याचा वेग ताशी 6 हजार एकर, रात्रीत एक लाख एकर खाक; कोलोराडोच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा

डेन्वरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 हजार फूट उंचीपर्यंत धुराचे लोट पसरल्याचे उपग्रह छायाचित्रे
  • 05 लाख एकर वनक्षेत्र उद्ध्वस्त, जंगलात स्फोटांचे आवाज

अमेरिकेत ५९ लाख लोकसंख्येच्या कोलोराडो राज्यात इतिहासातील सर्वात मोठा वणवा पेटला आहे. गुरुवारी रात्रीतून सुमारे एक लाख एकर वनक्षेत्र खाक झाले. ही आग ताशी ६ हजार एकर वेगाने पसरत आहे. आगीमुळे रॉकी माउंटेन नॅशनल पार्क व ग्रँडबी भाग पूर्णपणे पिवळा पडला आहे. त्यावरून आगीचे रौद्ररूप लक्षात येऊ शकेल. एवढेच नव्हे तर या वणव्याचा धूर ४० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचला आहे. एवढ्या उंचीवरील धुराची उपग्रह छायाचित्रे स्पेस तंत्रज्ञान कंपनी मॅक्सरने जारी केली आहेत. ग्रँडबी कौंटीचे महापौर ब्रेट सोएटलिन म्हणाले, ही आग निवासी भागाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे बहुतांश भागांतील लोकांना हलवण्यात येत आहे. या आगीमुळे एका आठवड्यात सुमारे ५ लाख एकर वनक्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. जंगल भागात स्फोट होत होते.

हवामान बदलामुळे उष्णतेत वाढ :

अमेरिकेच्या हवामान विभागाच्या अहवालानुसार कोलोराडोमध्ये सध्या ७ ठिकाणी मोठे वणवे आहेत. वणव्यामुळे यंदा कॅलिफोर्नियात ४० लाख एकरहून जास्त वन क्षेत्र खाक केले. हवामान बदलामुळे वणव्याच्या घटनांत वाढ झाल्याचे मानले जाते. त्याशिवाय उष्णतेतदेखील वाढ झाली आहे.