आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:कॅलिफोर्नियात अग्नितांडव, 9 हजार एकर जंगल खाक, 2100 जणांना हटवले

सॅन दिएगो9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र कॅलिफोर्नियाच्या विंटर काउंटीचे आहे. येथे मागील पाच दिवसांपासून आग पसरत आहे. आता ती रहिवासी भागात पसरत आहे. - Divya Marathi
छायाचित्र कॅलिफोर्नियाच्या विंटर काउंटीचे आहे. येथे मागील पाच दिवसांपासून आग पसरत आहे. आता ती रहिवासी भागात पसरत आहे.
  • मागील 24 तासांतच 8000 एकरांत पसरली आग, गेल्या वर्षीही 25 हजार घरे खाक झाली होती

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात उष्णता वाढण्यासोबतच जंगलात आग लागत आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या कॅम्प पेंडलटनमध्ये गेल्या २४ तासांत सुमारे ८ हजार एकर परिसर खाक झाला. तर लॉस एंजलिसच्या वेगवेगळ्या भागात १२०० एकरमध्ये आगीमुळे मोठे नुकसान झाले. लॉस एंजलिसच्या व्हेंच्युरा काउंटीत आगीच्या तीन घटनांमध्ये २०० एकर जंगल नष्ट झाले. लेक पिरू भागातून १२०० जणांना लगेच निघण्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे १२५ पेक्षा जास्त कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. हेलिकॉप्टरने रसायनाची फवारणी केली जात होती.

आग विझवण्याचे बजेट कोरोनावर खर्च झाले :

कॅलिफोर्निया राज्याने आग विझवण्याची उपकरणे आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी ७६०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे बजेट केले होते. मात्र कोरोना विषाणूमुळे राज्यात ५४ अब्ज डॉलर बजेट तोटा झाला आहे. यामुळे प्रशासनाने सर्व प्रकल्प थांबवले. यामुळे यंदाही आगीवर नियंत्रण मिळवणे मोठे आव्हान असेल.

बातम्या आणखी आहेत...