आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार:इम्रान यांच्या पायाला लागल्या 3-4 गोळ्या, रुग्णालयात दाखल; एका खासदारासह 4 जखमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लॉन्ग मार्चमध्ये गुरुवारी एका व्यक्तीने गोळीबार केला. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, या घटनेत इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. ते जखमी असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत इम्रान यांच्या 'पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षा'चे (पीटीआय) खासदार फैजल जावेद यांच्यासह त्यांचे 4 कार्यकर्ते जखमी झालेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे ही घटना घडली. इम्रान उभ्या असणाऱ्या कंटेनरजवळ गोळीबार झाला. PTI नेते इम्रान इस्माइलने सांगितले की, इम्रान खान यांच्या पायात 3 ते 4 गोळ्या लागल्या आहेत. हल्ला झाला होता तेव्हा मी त्याच्या बाजूलाच होतो. त्यांच्यावर AK-47 मधून फायरिंग करण्यात आली. हल्लेखोर त्यांच्या कंटेनरच्या अगदी जवळ होता.

दुसरीकडे, हल्लेखोराविषयी 2 गोष्टी उजेडात येत आहेत. AFP ने आपल्या सहयोगींचा दाखला देत हल्लेखोर ठार झाल्याचा दावा केला आहे. तर डॉन न्यूजने गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केल्याचे म्हटले आहे.

हल्लेखोराचा हा व्हिडिओ उजेडात आला आहे, त्यात तो रॅलीच्या गर्दीतून AK-47 घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत य़आहे. पण त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला अरेस्ट करण्यात आले.
हल्लेखोराचा हा व्हिडिओ उजेडात आला आहे, त्यात तो रॅलीच्या गर्दीतून AK-47 घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत य़आहे. पण त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला अरेस्ट करण्यात आले.

जखमी इम्रान यांनी केले समर्थकांना अभिवादन

रॅलीत गोळी लागल्यानंतर जखमी झालेल्या इम्रान खान यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी समर्थकांचे हात हलवून अभिवादन केले. त्यानंतर सुरक्षा रक्षक व समर्थकांच्या घेराबंदीत त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. इम्रान यांच्या पायात गोळी लागली आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर इम्रान यांची पहिली प्रतिक्रियाही आली आहे. तो म्हणाला - अल्लाहने आपल्याला नवे आयुष्य दिले आहे. इंशाल्लाह आम्ही पुन्हा पुनरागमन करणार व आपला संघर्ष यापुढेही सुरू ठेवू.

इम्रान यांनी गत आठवड्यातच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा तथा देशात तत्काळ निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी लॉन्ग मार्च सुरू केला होता. या मार्चमध्ये आतापर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांत एका महिला पत्रकारासह 3 जणांचा बळी गेला आहे.

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.

शाहबाज यांनी आपली पीसी रद्द केली, रिपोर्ट मागवला

पंतप्रदान शाहबाज शरीफ यांनी वजिराबादमध्ये झालेल्या या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाक सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या एका ट्विटनुसार, त्यांनी गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांना IGP व पंजाबच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणी तत्काळ रिपोर्ट मागवण्याचे निर्देश दिलेत. याशिवाय शाहबाज यांनी आपली नियोजित पत्रकार परिषदही रद्द केली आहे.

PTI खासदार फैजल जावेदही गोळीबारात जखमी झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.
PTI खासदार फैजल जावेदही गोळीबारात जखमी झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.

इम्रान यांचा आझादी मार्च 28 ऑक्टोबरपासून सुरू

इम्रान यांनी गत आठवड्यातच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा तथा देशात तत्काळ निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी लॉन्ग मार्च सुरू केला होता. या मार्चमध्ये आतापर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांत एका महिला पत्रकारासह 3 जणांचा बळी गेला आहे.

इम्रानच्या कंटेनरने पत्रकाराला चिरडले

इम्रान खानच्या लॉन्ग मार्चमध्ये रविवारी कंटेनरने चिरडल्यामुळे एका महिला पत्रकाराचा बळी गेला. त्यांना ढकलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. मृत सदफ नईम चॅनल 5 च्या रिपोर्टर होत्या. त्या इम्रान यांची रॅली कव्हर करत होत्या. एक दिवसांपूर्वीच त्यांनी इम्रान यांची मुलाखत घेतली होती. इम्रान केंद्रातील सत्ताधारी शरीफ सरकारविरोधात लाहोरहून इस्लामाबादपर्यंत लॉन्ग मार्च काढत आहेत.

लॉन्लॉग मार्च कव्हर करण्यापूर्वी सदफने आपले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते.
लॉन्लॉग मार्च कव्हर करण्यापूर्वी सदफने आपले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते.

7 महिन्यांत दुसरा लॉन्ग मार्च

इम्रान यांनी गत मे महिन्यातच सरकारविरोधात रॅली काढली होती. त्यातही मोठा हिंसाचार झाला होता. त्यावेळी इम्रान म्हणाले होते -मी राजकारण नव्हे तर जिहादसाठी बाहेर पडल्याचे मी अगोदरच स्पष्ट करतो. सरकारला 6 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली नाही तर आम्ही पुन्हा इस्लामाबादला धडक देऊ. त्यानंतर निवडणुकांची घोषणा होईपर्यंत आम्ही तेथून मागे हटणार नाही.

या मार्चला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने इम्रान यांनी तो मागे घेतला. ते म्हणाले - लॉन्ग मार्चमध्ये निरापराध व्यक्तींचा बळी जाऊ नये यासाठी आम्ही इस्लामाबाद लॉन्ग मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आमच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीमार केला. उल्लेखनीय म्हणजे या मार्चपूर्वीच लष्कराने इम्रान यांना अमेरिकेविरोधात न बोलण्याची तंबी दिली हती. पण खान यांनी त्याकडे दुर्लक्ष करत अमेरिकेसह पाकिस्तानी लष्करावरही टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...