आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या शाळेत गोळीबार:9 शिक्षकांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी, दहशतवादी हल्ल्यात 6 सैनिक ठार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील खुर्रम जिल्ह्यात गुरूवारी एका शाळेत झालेल्या गोळीबारात 7 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार दहशतवाद्यांनी केला की, वैयक्तिक वैरातून ही घटना झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याच भागात गोळीबाराची दुसरी एक घटना घडली आहे. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटना 6 किलोमीटर अंतरादरम्यान घडल्या आहेत.

दुसरीकडे खैबर प्रांतातही एक दहशतवादी हल्ला झाला आहे. यात टीटीपी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

परीक्षा रद्द

  • दरम्यान, या हल्ल्यानंतर पुढील आठवड्यापासून येथे सुरू होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
  • न्यूज एजन्सीनुसार - शिक्षकांवर हल्ल्याची घटना खुर्रम जिल्ह्यातील टेरी मंगल हायस्कूलमध्ये घडली. येथील कर्मचारी कक्षात शिक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा संच तयार करत होते.
  • यादरम्यान कारमधून काही हल्लेखोर येथे पोहोचले. शाळेबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलिसही उपस्थित होते. हल्लेखोरांनी बॅरिकेड्स तोडून शाळेत प्रवेश केला आणि थेट स्टाफ रूम गाठली. येथे पोहोचताच गोळीबार सुरू झाला. यात सर्व 7 शिक्षकांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर त्याच गाडीतून पळून गेले.
  • काही वेळाने पोलीस आले आणि त्यांनी परिसर सील केला. अद्यापपर्यंत हल्लेखोरांचा सुगावा लागलेला नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे प्रकरण शिया-सुन्नी वादाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मारले गेलेले सर्व शिक्षक शिया समुदायातील असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, याची पुष्टी होऊ शकली नाही.
  • राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अल्वी म्हणाले- ज्या लोकांनी हा हल्ला केला ते खरे तर शिक्षणाचे शत्रू आहेत. पाकिस्तान अशा हल्ल्यांना घाबरत नाही.
  • या हायस्कूलपासून 6 किमी अंतरावर दुचाकीवरून जात असलेल्या आणखी दोन शिक्षकांवरही गोळीबार झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षकांवरील दोन्ही हल्ल्यांचा काय संबंध, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

दहशतवादी हल्ल्यात 6 जवान शहीद

  • दुसरीकडे गुरुवारी तालिबानने खैबर पख्तुनख्वा प्रांतातील या खुर्रम भागातील दिरदोनी येथे केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 6 सैनिक ठार झाले. हल्ल्यानंतर दहशतवादीही आरामात पळून जाण्यात यशस्वी झाले. लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
  • याच भागात दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने अब्दुल जब्बार शाह या तालिबानी म्होरक्याला ठार केले होते. यानंतर तालिबानने बदला घेण्याची धमकीही दिली होती. तालिबानने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.
  • वास्तविक, हा परिसर अफगाणिस्तानला लागून आहे. येथे लष्कर तालिबानविरोधात कारवाई करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या या कारवाईत 19 जवान शहीद झाले असून केवळ 2 दहशतवादी मारले गेले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही तणाव कायम आहे. दहशतवादी हल्ले करून अफगाण सीमेवर पळून जातात आणि तिथे सुरक्षित आश्रय शोधतात, असा पाकिस्तानचा आरोप आहे. अफगाणिस्तानवर सत्ता गाजवणारे तालिबान याला खोटा आरोप म्हणत आहेत.

ही बातमीही वाचा...

सर्बियाच्या शाळेत गोळीबार, 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू:सर्व विद्यार्थी एकाच वर्गातील, 14 वर्षीय आरोपीस अटक

सर्बियाची राजधानी बेलग्रेडजवळील एका शाळेत बुधवारी एका विद्यार्थ्याने गोळीबार केला. यात एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 7 व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शाळा रिकामी केल्यानंतर पोलिसांनी शाळा सील केली आहे. (वाचा संपूर्ण बातमी)