आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Firing On Imran Khan Health Updates, Shot In Leg, Protests By Supporters Across The Country, Doctor Said Condition Is Stable

इम्रान खानवर गोळीबार, पायाला लागली गोळी:देशभरात समर्थकांची निदर्शने, लाहोर रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले- प्रकृती स्थिर

गुजरांवालाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी, 3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या इस्लामाबाद मोर्चात एका व्यक्तीने गोळीबार केला. यादरम्यान इम्रान खान यांच्या पायाला तीन ते चार गोळ्या लागल्या. घटनेच्या वेळी ते कंटेनरवर काही लोकांसोबत उभे असलेल्या समर्थकांना अभिवादन करत होते. त्यावेळी हल्लेखोराने गोळीबार केला.

इम्रान यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे डॉक्टर फैसल सुलतान यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या पायाच्या हाडात गोळी लागली आहे. ती ऑपरेशनद्वारे काढली जाईल.

पीटीआय नेते इम्रान इस्माईल यांनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा ते इम्रान यांच्या शेजारी होते. ते म्हणाले- हल्लेखोराने AK-47 मधून गोळीबार केला आणि तो कंटेनरच्या अगदी जवळ होता.
पीटीआय नेते इम्रान इस्माईल यांनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा ते इम्रान यांच्या शेजारी होते. ते म्हणाले- हल्लेखोराने AK-47 मधून गोळीबार केला आणि तो कंटेनरच्या अगदी जवळ होता.

हल्ल्यात अनेकांचा सहभाग - पीटीआय

'डॉन न्यूज'नुसार, इम्रान यांचा मोर्चा पंजाबच्या वजिराबाद भागात पोहोचला होता. ज्या कंटेनरवर इम्रान उपस्थित होते. त्याच्या जवळ गोळीबार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर इम्रान यांच्या पक्षाचे पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांच्यासह 13 जण जखमी झाले.

दरम्यान, पीटीआयचे सरचिटणीस असद उमर यांनी गुरुवारी दावा केला की, पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या या हत्येच्या प्रयत्नामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि एक वरिष्ठ लष्करी अधिकारी असल्याचा संशय आहे.

या हल्ल्याच्या निषेधार्थ इम्रान समर्थकांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. पीटीआयचे नेते अली हैदर जैदी यांनीही या हल्ल्यामागे एकच नेमबाज नसल्याचा आरोप केला आहे. यात आणखी अनेक लोक गुंतलेले आहेत.
या हल्ल्याच्या निषेधार्थ इम्रान समर्थकांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. पीटीआयचे नेते अली हैदर जैदी यांनीही या हल्ल्यामागे एकच नेमबाज नसल्याचा आरोप केला आहे. यात आणखी अनेक लोक गुंतलेले आहेत.

हल्लेखोराचा व्हिडिओ आला समोर

या घटनेनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर शस्त्रांसह गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मागून एका व्यक्तीने त्याला पकडल्याने तो त्याच्यापासून पळू लागला, मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला लगेच पकडले.

हल्लेखोराचा हा व्हिडिओ समोर आला असून, त्यात तो रॅलीतील गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
हल्लेखोराचा हा व्हिडिओ समोर आला असून, त्यात तो रॅलीतील गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

घटनास्थळी 11 बुलेट शेल जप्त

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले - घटनास्थळी 11 बुलेट शेल सापडल्या आहेत. यापैकी 9 पिस्तुलाच्या गोळ्यांच्या, तर दोन मोठ्या बंदुकीच्या गोळ्यांचे होते. ते म्हणाले– जमिनीवरून कंटेनरच्या दिशेने पिस्तुलच्या गोळ्या झाडण्यात आल्या, तर कंटेनरमधून मोठ्या बंदुकीतून जमिनीवर गोळीबार करण्यात आला. त्याचवेळी, पीटीआय नेत्यांचे म्हणणे आहे की, हा हल्ला एके-47 ने करण्यात आला.

हल्लेखोर म्हणाला- अजानच्या वेळी डीजे वाजवायचे, इम्रान खान वाचला याचा खेद

हल्लेखोराचे हे छायाचित्र पोलीस कोठडीत बनवलेल्या व्हिडिओतून घेतले आहे.
हल्लेखोराचे हे छायाचित्र पोलीस कोठडीत बनवलेल्या व्हिडिओतून घेतले आहे.

इम्रान खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे पहिले वक्तव्य समोर आले आहे. मोर्चादरम्यान झालेल्या गोळीबाराचे कारण त्याने सांगितले आहे. तो म्हणाला- तो एकटाच हल्ला करायला आला होता. त्याला इम्रानला मारायचे होते, कारण खानच्या लाँग मार्चमध्ये अजानच्या वेळीही डेक (डीजे) वाजत होता. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव फैसल, तर काहींमध्ये जावेद इक्बाल असे नमूद करण्यात आले आहे.

जखमी इम्रान यांनी समर्थकांना केले अभिवादन

गोळी लागल्याने जखमी झालेल्या इम्रान खान यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी आपल्या समर्थकांना अभिवादन केले. यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकांच्या घेरावाखाली त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. इम्रान यांच्या पायाला गोळी लागली आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर इम्रान खान यांचीही पहिली प्रतिक्रिया आली आहे. अल्लाहने आपल्याला नवजीवन दिले आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे. इंशाअल्लाह आम्ही पुन्हा परत येऊ आणि आमचा लढा सुरू ठेवू.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांच्या मदतीने इम्रान यांना कंटेनरमधून दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांच्या मदतीने इम्रान यांना कंटेनरमधून दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले.

शाहबाज यांनी रद्द केली पत्रकार परिषद, अहवाल मागवला

वजिराबाद येथील गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने केलेल्या ट्विटनुसार, त्यांनी गृहमंत्री राणा सनाउल्ला यांना आयजीपी आणि पंजाबचे मुख्य सचिव यांच्याकडून घटनेचा त्वरित अहवाल घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय शाहबाज शरीफ यांनी आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे.

या गोळीबारात पीटीआयचे खासदार फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.
या गोळीबारात पीटीआयचे खासदार फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.

इम्रान यांनी 28 ऑक्टोबरला आझादी मार्चला केली सुरुवात

इम्रान यांनी 28 ऑक्टोबर रोजी शाहबाज शरीफ सरकारचा राजीनामा आणि तत्काळ सार्वत्रिक निवडणुकांच्या मागणीसाठी लाँग मार्च सुरू केला होता. या लाँग मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका महिला पत्रकारासह तीन जणांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

15 वर्षांपूर्वी बेनझीर भुट्टो यांचीही अशीच झाली होती हत्या

इम्रान यांच्या आधी 27 डिसेंबर 2007 रोजी माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावरही असाच हल्ला झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. भुट्टो रावळपिंडीच्या रॅलीतून परतत असताना हल्लेखोर त्यांच्याजवळ आला आणि त्याने गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवले. बेनझीर भुट्टो दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या, पण त्यांचा कार्यकाळ कधीच पूर्ण करू शकल्या नाहीत. बेनझीर यांचा मुलगा बिलावल भुट्टो हे सध्या शाहबाज सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत.

बातम्या आणखी आहेत...