आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्याकडे प्रसार माध्यमांनी केलेला कानाडोळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तथा पती डोनाल्ड ट्रम्प यांना आवडला नाही. त्यांनी मीडियावर टीका केली. मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात सुंदर फर्स्ट लेडी आहेत तरीही कधी कोणत्याही नियतकालिकाने आपल्या कव्हर पेजवर त्यांना जागा दिली नाही. ही माध्यमांची भेदभावपूर्ण वागणूक आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
तुलनेने पाहिल्यास बराक आेबामा यांच्या कार्यकाळात पत्नी मिशेल यांना ८ वर्षांत १२ वेळा कोणत्या ना कोणत्या मासिकावर झळकण्याची संधी मिळाली होती. त्यावरून ट्रम्प यांनी माध्यमांचा समाचार घेतला. माझ्या कार्यकाळात कोणीही मेलानिया यांना अशी संधी दिली नाही. परंतु आता कार्यकाळ संपत असताना मीडिया मेलानिया यांना महान असल्याचे संबोधत आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. दुसरीकडे ट्रम्प यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया काही मासिकांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी मात्र अध्यक्षांचे म्हणणे योग्य असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपली नाराजी सोशल मीडियातून जाहीर केली. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर लोक म्हणाले, मेलानिया खरोखरच खूप सुंदर आहेत. परंतु मीडिया त्यांना जाणूनबुजून दुर्लक्षित केले. मीडिया ट्रम्प यांच्याबद्दल फेक न्यूज पसरवण्यात तरबेज आहे. मीडियावर बहिष्कार घालावा, अशी मागणीही काहींनी केली.
ट्रम्प यांच्याशी विवाह करण्यापूर्वी मेलानिया एक मॉडेल होत्या. विवाहानंतर मेलानिया यांना क्रिश्चियन डायर वेडिंग ड्रेसमध्ये व्होगच्या मुखपृष्ठावर झळकण्याची संधी मिळाली होती. ५६ वर्षीय मिशेल व्हाइट हाऊसमध्ये असताना १२ वेळा मुखपृष्ठावर होत्या. ५० वर्षीय मेलानिया यांच्या वाट्याला अशी प्रसिद्धी आली नाही.
कोरोना लस नाताळचा चमत्कार : ट्रम्प
नाताळच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प व फर्स्ट लेडी मेलानिया यांनी कोरोना लस हा नाताळचा चमत्कार असल्याचे संबोधले. त्यांनी एक व्हिडिआे जारी करून लोकांना शुभेच्छा दिला. आम्ही सर्व संशोधक, कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. या सर्वांनी कठीण काम शक्य करून दाखवले. वास्तविक हा नाताळचा चमत्कार आहे. मेलानिया म्हणाल्या, यंदाचा नाताळ वेगळा आहे. आपण सगळे महामारीला तोंड देत आहोत. यादरम्यान लोकांनी परस्परांशी जोडले जाण्याचे नवे मार्ग शोधले. ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.