आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑक्सफाेर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीची चौथ्या टप्प्यात चाचणी करावी लागू शकते. अॅस्टाझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरिऑट यांनी गुरुवारी स्वत:च ही शक्यता वर्तवली. पास्कल यांच्यानुसार, या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असले तरी आम्हाला त्याची पडताळणी करावी लागणार आहे. यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा नवा अभ्यास केला जाऊ शकतो. मात्र, तो तातडीने पूर्ण होईल. याचे कारण म्हणजे लस किती गुणकारी आहे हे स्पष्ट आहे. यासाठी आम्ही पुढील चाचणी कमीत कमी लोकांवर करून पडताळणी करू शकतो.
दरम्यान, असे असले तरी डिसेंबरअखेर ही लस उपलब्ध होईल, असे मानले जाते. जगभरात इतर लसी विकासाच्या तिसऱ्या टप्प्यातच आहेत.
चौथ्या टप्प्याची गरज का? : वास्तविक काही दिवसांपूर्वी या कंपन्यांनी आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले होते. यात ही लस ९०% गुणकारी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिसऱ्या टप्प्यात चाचणीत झालेल्या एका चुकीमुळे हे निष्कर्ष मिळाल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांनी चुकून २,८०० लोकांना लसीचा निम्माच डोस दिला होता. तर, सुमारे ८,९०० लोकांना पूर्ण दोन डोस देण्यात आले होते. मात्र, ज्यांना पूर्ण डोस दिला त्यांच्यावर ही लस ६२ टक्के तर, ज्यांना निम्माच डोस मिळाला त्यांच्यावर ९०% गुणकारी ठरली. म्हणजेच सरासरी लसीचा प्रभाव ७०% राहिला. म्हणूनच तज्ज्ञांनी या लसीच्या परिणामांबाबत शंका व्यक्त केली. त्यांच्या मते वेगवेगळा डोस देऊनही त्याच्या परिणामांत एवढा फरक का? शिवाय निम्मा डोस देऊनही परिणाम अधिक चांगला कसा झाला?
भारतासाठी लसीकरण कठीण नाही : तज्ज्ञ
जुलै-२०२१ पर्यंत ५० कोटी डोस मिळवण्याचे भारत सरकारचे लक्ष्य आहे. ही लस सुमारे २५ कोटी लोकांना दिली जाईल. तज्ज्ञांचे मत पाहता भारतासाठी हे कठीण काम नाही. कारण, जगातील ६० टक्के औषधे येथेच तयार होतात. विविध आजारांच्या लसीकरणाचा देशाकडे ४० वर्षांहून अधिक अनुभव आहे. येथेच नवजात बालके तसेच गर्भवती महिलांसाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.