आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत या आठवड्यात एक विचित्र घटना घडली आहे. पुर्व टेक्सासच्या टेक्सरकाना शहरात आलेल्या वादळात चक्क माशांचा पाऊस पडला आहे. आयुष्यात पहिल्यांदा माशांचा पाऊस पाहिल्यानंतर टेक्सरकाना येथील नागरिक देखील हैराण झाले आहेत.
पाऊस संपल्यानंतर जेव्हा नागरिक घराबाहेर गेले, तेव्हा सर्वत्र मासेच-मासे पसरलेले होते. ते पाहून नागरिकांनी मोठा धक्काच बसला. त्यानंतर शहरातील एका फेसबुक पेजवरुन असे सांगण्यात आले की, ही कोणतीही जादू नसुन, या विचित्र घटनेला विज्ञानात 'अॅनिमल रेन' असे म्हटले गेले आहे.
कसा असतो अॅनिमल रेन
अॅनिमल रेनचा अर्थ असा होतो की, आकाशातून जीवांचे खाली पडणे हे होय. ज्या वेळी काही भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते, त्या वेळी अशा घटना घडतात. इंग्रजीत याला वॉटर स्पाउट्स असे देखील म्हटले जाते. जेव्हा हा चक्रीवादळ निर्माण होतो, तेव्हा तो समुद्रातील पाण्यासोबत त्यातील लहान झाडे आणि प्राण्यांना देखील आपल्यासोबत ओढून लांब नेतो.
चक्रीवादळाचा वेग वाढल्यानंतर, समुद्रातील अनेक जीव त्याच्या विळख्यात सापडतात. त्यानंतर हा चक्रीवादळ जमीनाकडे खेचला जातो. चक्रीवादळाचा वेग कमी झाल्यानंतर त्यात असलेले जीव हळू-हळू जमीनीवर पडायला सुरुवात होतात. त्यामुळे असे वाटते की, आकाशातून जीवांचा पाऊस पडला आहे की काय?
माशांच्या पावसाने नागरिक हैराण
बुधवारी झालेल्या या घटनेनंतर शहरातील लोक हैराण झाले आहेत. सोशल मीडिया अनेकांनी प्रतिक्रिया देत लिहले आहे की, आम्हाला असे वाटते की, गारांचा पाऊस पडत आहे. मात्र पाऊस थांबल्यानंतर आमच्या लक्षात आले की, तो गारांचा पाऊसनसुन चक्क माशांचा पाऊस पडला आहे.
द टेक्सरकाना गजट या वृत्तपत्राशी संवाद सांधताना अनेकांनी सांगितले आहे की, माशांचा पाऊस पडला असून, माशांचा आकार हा 6 ते 7 इंचा इतका होता. माशांचे डोके फुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे आम्हाला असे वाटले की, हे मासे प्रचंड उच्च जागेवरुन खाली पडले असावे. तर काही जणांना चक्क रस्त्यावरील मासे बघताच गोळा करण्यास सुरुवात केली आणि घरी नेऊन त्यावर मस्त ताव मारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.