आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादी प्रसिध्‍द:अमेरिकी वित्त क्षेत्रात 100 सर्वात प्रभावी महिलांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिलांचा समावेश

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या वित्त क्षेत्रातील १०० प्रभावी महिलांमध्ये पाच भारतीय वंशाच्या एग्झीक्युटिव्हजचा समावेश झाला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलचे मॅग्झीन बॅरने वित्तीय सेवा उद्योगात प्रमुखपद प्राप्त करणे आणि भविष्य बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचा समावेश केला आहे. या चौथ्या वार्षिक यादीत वित्तीय सेवा, उद्योग जगत, एनजीओ आणि सरकारी क्षेत्रात स्थापित तसेच उभरत्या नेत्यांचा समावेश केला जातो. भारतीय वंशाच्या ५ महिलांमध्ये जे पी मॉर्गर्नच्या अनु अय्यंगार, एरियल इन्व्हेस्टमेंटच्या रूपल जे भन्साळी, फ्रँकलिन टेंपलटनच्या साेनाली देसाई, गोल्डमन साक्सच्या मीना पिलन आणि बँक ऑफ अमेरिकेच्या सविता सुब्रमण्यम आहेत. अनु अय्यंगार यांनी जानेवारीत जे पी मॉर्गनच्या मर्जर अॅड अॅक्विजिशनच्या(एमअँडए) जागतिक प्रमुख पदाच्या रूपात पदभार स्वीकारला आहे. याआधी २०२० पासून या विभागाच्या त्या सहप्रमुख होत्या. आकडेवारीत असणारा रस, कायदेशीर कंत्राट आणि ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्यात त्यांचा हातखंडा असल्यामुळे एमअँडए क्षेत्रात त्यांनी आगेकूच केली. रूपाली जे भन्साळी इक्विटी स्ट्रेटेजीसमध्ये मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि पोर्ट फोलियो मॅनेजर आहेत.त्या १०० वूमेन इन फायनान्सच्या संचालक मंडळाच्या सदस्य आहेत. वित्तीय क्षेत्रात त्या महिलांना प्रोत्साहन देतात.

चीफ इन्व्हे. अधिकारी होऊन सोनालींनी रचला इतिहास
साेनाली देसाई यांनी २०१८ मध्ये फ्रँकलिन टेंपल्टनच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला बनून इतिहास रचला. मीना फ्लिन गाेल्डमन साक्समध्ये ग्लाेबल प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंटमध्ये सहप्रमुख आहेत. १९९९ मध्ये जे पी माॅर्गनमधून कामास प्रारंभ केला. त्या सांगतात की, आता अनेक महिला संपत्ती व्यवस्थापनात येत आहेत. सविता सुब्रमण्यन बँक अाॅफ अमेरिकेत इक्विटी अँड व्वांटिटेटिव्ह स्ट्रॅटेजच्या प्रमुख आहेत. त्या एसअँडपी ५०० व अन्य प्रमुख अमेरिकी बाजारांसाठी अंदाजावर काम करतात.