आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:कोरोनामुळे ट्यूलिपचा बाजार बंद पडल्याने पाच जुन्या मित्रांनी तयार केले नवीन बिझनेस मॉडेल, अन् मागणी प्रचंड वाढली...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बगिच्याचे सौंदर्य लोकांना बघता यावे यासाठी सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी ट्यूलिप गार्डनची फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग केली जात आहे. - Divya Marathi
बगिच्याचे सौंदर्य लोकांना बघता यावे यासाठी सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी ट्यूलिप गार्डनची फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग केली जात आहे.
  • बुडणाऱ्या व्यवसायाला मैत्रीची शक्ती आणि नाविन्यपूर्ण कल्पनेने अशी नवी दिशा दिली

कर्क जॉन्सर

वॉशिंग्टनच्या माउंट वर्नोन विद्यालयातील १९९४ बॅचच्या पाच मित्रांनी लॉकडाऊन दरम्यान एक नवीन व्यवसाय उभा केला. हे मित्र आहेत- अँड्रयू मिलर, अँजेला स्पायर, डॉनी केल्ट्झ, राचेल वार्ड आणि रँडी हाॅवर्ड. पाचही आपापल्या व्यवसाय व कुटुंबासोबत व्यस्त असताना गेल्या वर्षी अँड्रयूने जुन्या मित्रांना फोन केला आणि सांगितले की, आपल्या शहरात जाऊन ट्यूलिपची शेती का करू नये. मित्रांमध्ये जुनी भावना कायम होती. सर्व तयार झाले आणि गेल्या उन्हाळ्यात ३० एकर शेती विकत घेतली. एक कंपनी बनवली आणि तिचे नाव ठेवले द स्पीनिच बस. यंदा ट्यूलिपचे उत्पादन चांगले झाले. मात्र, मार्च आणि एप्रिल महिन्यांत पीक उत्तम असतानाच लॉकडाऊन झाले. वार्षिक ट्यूलिप उत्सव रद्द करण्यात आला. त्यात दरवर्षी हजारो लोक येतात. ट्यूलिप अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. राष्ट्रीय किरकोळ कंपन्या नेहमीच लाखो फुले घेतात, यावेळी विकत घेण्याच्या स्थितीत नव्हत्या. जुन्या मागण्याही रद्द झाल्या.

अँजेला स्पायर सांगतात की, आमच्या गटाची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, आम्ही पाचही जणांनी एकमेकांचा तणाव, दु:ख, चिंता अनेकदा बघितली आहे आणि यातून बाहेर निघू याचा विश्वास असतो. अाम्ही नवीन बिझनेस मॉडल शोधत असतानाच मार्चमध्ये एक सुखद फोन आला. फोन करणाऱ्याने विचारले की, तुम्ही काही फुलं पाठवू शकता का? ही नवीन गोष्ट होती. सामान्यपणे ज्यांना आपल्या बगिच्यात लागवड करायची असते त्यांना ठाेक स्वरूपात फुलांचा पुरवठा केला जातो. बुकेसाठी मागणी होत नसते. पाचही मित्रांनी एक संधी म्हणून त्याकडे बघितले आणि धोरण तयार करत पुरवठा सुरू केला. शिपिंगसाठी कंपनीकडे सुमारे ६०० बॉक्स होते. प्रत्येक बॉक्समध्ये २० फुले मावतात. 

सर्वांना वाटले की, त्यांना २००- ३०० बॉक्सची मागणी तर मिळूच शकते. मात्र पहिल्या काही दिवसांतच सर्व बॉक्स विकले गेले. पुढील काही दिवसांत ८००० बुके विकले गेले. हा एक नवा व्यवसाय झाला. कोरोनाचा मुकाबला करणारे आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना फुले देण्याची पद्धत सुरू झाली. कंपनीकडे बुकेच्या ४७०० नवीन ऑर्डर आल्या.

बातम्या आणखी आहेत...