आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मोफत विमान प्रवास अन् स्वस्त उपचारांसोबत फाइव्ह स्टार हॉटेलची सुविधा; 7400 कोटी रुपयांच्या व्यवसायासह तुर्की ठरले केशरोपणाचे प्रमुख केंद्र

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्तंबूलमध्ये 300 हून अधिक क्लिनिक, अमेरिका-ब्रिटनमधूनही लोक उपचारासाठी येतात

केस गळणे ही समस्या जगभरात पुरुष आणि महिलांना भेडसावत आहे. त्याचे कारण आनुवंशिक, खाण्या-पिण्याच्या सवयी, आजार, औषधे, जखमा, एवढेच नाही तर हेअरस्टाइल यापैकी काहीही असू शकते. दुर्दैवाने त्यावर कुठलाही उपचार नाही, पण एक तोडगा आहे, तो म्हणजे केशरोपण. तुर्कीने त्यासाठी ७,४०० कोटी रुपयांचा उद्योग उभारला आहे. केशरोपण करणाऱ्यांसाठी तुर्की प्रमुख केंद्र ठरले आहे. गेल्या काही वर्षांत तुर्कीच्या शल्यविशारदांनी केशरोपण क्षेत्रात स्वत:ची मजबूत ओळख निर्माण केली आहे.

एकट्या इस्तंबूलमध्ये ३०० पेक्षा जास्त क्लिनिक या समस्येचे निवारण करत आहेत. देशभरात दर आठवड्याला १५० ते ५०० जणांवर केशरोपण केले जाते. ब्रिटिश असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जरीचे अध्यक्ष डॉ. ग्रेग विलियम्स यांनी सांगितले की, ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत तुर्कीत ६०% ते ९०% कमी खर्चात केशरोपण होते. ब्रिटनमध्ये केशरोपणाचा खर्च ३० लाख रुपये आहे, तर तुर्कीत फक्त ३ ते ३.५ लाख रुपये आहे. तुर्कीचे अनेक क्लिनिक पॅकेज घेतल्यास मोफत सल्ला, विमान प्रवासाचा खर्च, विमानतळावरून हॉटेल आणि क्लिनिकपर्यंत घेऊन जाणे, परत सोडणे, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबण्याची आणि रुग्णाची भाषा समजणाऱ्या व्यक्तीची व्यवस्था करतात.

त्यामुळे अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांच्या लोकांची तुर्कीला पसंती आहे. तणावपूर्ण राजकीय संबंध असूनही २०१९ मध्ये इस्रायलमधून ५ लाखांपेक्षा जास्त लोक प्लास्टिक सर्जरी आणि केशरोपणासाठी तुर्कीत आले होते. तथापि, कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसांत लोकांची संख्या घटली आहे. तज्ज्ञांच्या मते, तुर्कीत शिक्षण,आरोग्य सेवा, भाडे युरोपच्या इतर देशांच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. त्यामुळे केशरोपणाचा खर्चही कमी आहे. भविष्यातही हा सर्वोत्तम पर्याय म्हणून कायम राहील.

ही किरकोळ शस्त्रक्रिया नाही, उपचाराआधी पडताळणी करणे आवश्यक: तज्ज्ञ
२२ वर्षांचा अनुभव असेलेले डॉ. कायहान साहिनोग्लू यांनी ५००० पेक्षा जास्त केशरोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी बाल्टिमोरमधून प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यांनी सांगितले की, ‘तुर्कीत अशी सेवा देणाऱ्या क्लिनिकवर कुठलेही कठोर नियंत्रण नाही. बरेचदा डॉक्टरऐवजी तंत्रज्ञच हे काम करतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’ ब्रिटनचे डॉ. ग्रेग विलियम्स यांनी सांगितले की, हा ट्रेंड चिंताजनक आहे. ही किरकोळ शस्त्रक्रिया नाही. प्रक्रिया चुकीची ठरली तर जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे उपचाराआधी डॉक्टर आणि क्लिनिकबाबत चांगल्या प्रकारे पडताळणी करून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...