आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइम मॅगझीनमधून:अमेरिकेतील हजारो लोकांमध्ये फ्लाइट अटेंडंट्सने प्राणघातक कोरोना पसरवला

3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • कर्मचारी युनियनच्या म्हणण्यानुसार हजारो कर्मचारी संक्रमणाने पीडित

वेरा बर्जेनग्रुएन
अमेरिकेतील फ्लाइट अटेंडंट्समध्ये जानेवारीच्या उत्तरार्धात चीनच्या हुबेई प्रांताच्या बाहेर नवीन कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याची बातमी पहिल्यांदा मिळाली होती. दोन महिन्यांहून अधिक काळानंतर, उड्डाण करणारे हवाई परिवहन सहायकांना असा संशय आहे की, ते स्वतःच समस्येचा धोकादायक भाग बनले आहेत. डझनहून अधिक फ्लाइट अटेंडंट टाइम मासिकाशी आणि ई-मेलद्वारे बोलताना म्हणतात, एअरलाइन्सने त्यांच्या समस्येवर लक्ष दिले नाही. ते म्हणतात, योग्य उपकरणांशिवाय अनेक आठवडे काम करत असताना, ते हजारो प्रभावित लोकांच्या संपर्कात आले असावे. त्यानंतर त्यांनी हजारो अमेरिकन हवाई प्रवाशांमध्ये हा संसर्ग पसरवला असेल. अटलांटा येथे काम करणाऱ्या एका फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, आम्ही विमानाच्या आसनांमधून, शहरातून शहरात, हॉटेल ते हॉटेल आणि व्यक्तींमध्येे तो संसर्ग पसरला आहे.

अमेरिकन सरकार फ्लाइट अटेंडंटसना आवश्यक पायाभूत सुविधा कामगार मानते. देशात सुमारे एक लाख २१ हजार फ्लाइट अटेंडंट आहेत. धोकादायक भागात प्रवास करूनही त्यांना स्वत:ला क्वारंटाइन ठेवण्याची गरज नाही. प्रवाशांची विमानतळांवर सामान्य तपासणी केली जाते; परंतु त्यांची होत नाही. हवाई उड्डाणांवरील किती कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली याची माहिती एअरलाइन्स देत नाही; परंतु युनियन प्रतिनिधींचे म्हणणे आहे, शेकडो कर्मचाऱ्यांनी स्वत:ला संसर्ग झाल्याचे म्हटले आहे. फ्लाइट अटेंडंट्स म्हणतात, सुरुवातीला एअरलाइन्सने त्यांना ग्लोव्हज किंवा फेस मास्क घालण्यास मनाई केली होती. असे केल्यावर काही लोकांवर शिस्तभंगाचीही कारवाई केली. अनेक एअरलाइन्स अटेंडंट विमानाची केबिन स्वच्छ करतात. त्यांना जंतुनाशकही दिले जात नाही. विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रसारात अनेक उड्डाण परिचारकांना नोकरी वाचवण्यासाठी काम करण्यास भाग पाडले.

फ्लाइट अटेंडंट विमानात एकमेकांना लागून असलेल्या सीटवर बसतात. ते फक्त प्रवाशांचे स्वच्छतागृह वापरतात. काही लोक म्हणाले की, रिकाम्या उड्डाणांवरही त्यांना प्रवाशांच्या आसनावर बसण्याची परवानगी नाही. एका महिला फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, प्रत्येक वेळी जेव्हा मी प्रवास सुरू करण्यासाठी विमानतळावर जात असे तेव्हा रडायची.

प्रवाशांच्या संख्येत मोठी घसरण झाली असतानाही एअरलाइन्सने प्रवाशांना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला की, हवाई प्रवास सुरक्षित आहे. अमेरिकन एअरलाइन्स आणि साऊथ वेस्ट एअरलाइन्सने सर्व जेवण बंद केले आहे. बऱ्याच विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की, देशात सुरक्षा उपकरणांच्या कमतरतेमुळे उड्डाण करणाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरवली आहेत.

एअरलाइन्सला १९ लाख कोटींचे नुकसान होईल

टाइमशी संवाद साधणाऱ्या बऱ्याच फ्लाइट अटेंडंटनी नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती केली आहे. नाव उघड झाल्यावर त्यांना नोकरीवरून काढले जाऊ शकते.  हा धोका असाही वाढत आहे. तरी एअरलाइन्सने माध्यमांशी बोलण्यावर बंदी घातली आहे. एअरलाइन्स कंपन्यांच्या अडचणीही समजताे. यावर्षी १९.१९ लाख कोटींच्या उत्पन्नाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

(टाइम आणि टाइम लोगो नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. ते करारांंतर्गत वापरले आहेत.)

बातम्या आणखी आहेत...