आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:चीनहून अमेरिकेतील शहरांसाठी उड्डाणे कमी, विद्यार्थ्यांना भरमसाट पैसे मोजून खासगी विमानाने जाण्याची वेळ

वॉशिंग्टन / जेनेट लोरिन, एरिक क्रेब्सएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत पुढच्या सेमिस्टरसाठी महाविद्यालये खुली, परदेशी विद्यार्थ्यांना अडथळे

अमेरिकेत पुढल्या सेमिस्टरसाठी महाविद्यालये सुरू होऊ लागली आहेत. त्यासाठी परदेशी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छितात. परंतु अमेरिकेत येण्यासाठी त्यांना हवाई सेवेत अनेक अडथळे येत आहेत. उड्डाणांची संख्या कमी किंवा व्हिसासंबंधी अडचणींना ते तोंड देत आहेत. मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत २०१९-२० मध्ये ११ लाख परदेशी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला हाेता. त्यापैकी एक तृतीयांश विद्यार्थी चिनी आहेत. बहुतांश विद्यार्थी कोरोनामुळे चीनला परतले होते. आता त्यांना अमेरिकेत जाऊन पुन्हा शिक्षण घेण्याची इच्छा आहे. परंतु चीनहून अमेरिकेसाठी हवाई सेवा साेयीची दिसून येत नाही. कारण चीनने उड्डाणांची संख्या कमी केली आहे. म्हणून काही विद्यार्थ्यांना खासगी विमानाने अमेरिका गाठण्याची वेळ आली आहे. त्यासाठी त्यांना भरमसाट हवाई खर्चही करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांनी तर पाचपट जास्त पैसे मोजून तिकीट खरेदी केले आहे. काहींनी एकापेक्षा जास्त तिकिटांची खरेदी केली आहे. भारतासह इतर देशांतील विद्यार्थीही व्हिसा नियमांतील बदलांमुळे संभ्रमात आहेत. त्यामुळेच परराष्ट्र विभागाने कोरोनामुळे राजदूत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट केली आहे.

जयपूरचे पलाश चटर्जी म्हणाले, आमची तिकिटे रद्द होणार नाहीत अशी आशा वाटते. तसे झाल्यास अमेरिकेत जाऊन शिक्षण घेता येऊ शकेल. विविध समस्यांमुळे गेल्या वर्षी अमेरिकेतील महाविद्यालयांतील परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण १६ टक्क्यांनी कमी झाले. अमेरिकेतील आेहियो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉन हेलर म्हणाले, आजकाल विद्यार्थ्यांसाठी कॅनडाला जाणे सोपे झाले आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला
अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा प्रवास, लस व व्हिसा समस्यांसाठी २०० हून अधिक ऑनलाइन समुपदेशन सत्रांचे आयोजन केले. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना अर्धा डझन भाषांचा पर्याय दिला. एवढे असूनही विद्यार्थी स्थानिक समस्यांमध्ये अडकल्याने देशांतच प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये चीनहून अमेरिकेसाठी ६१ उड्डाणे निश्चित करण्यात आली आहेत. सामान्य दिवसांत या काळात एका महिन्यात अमेरिकेसाठी १ हजार ६२६ उड्डाणे असतात.

बातम्या आणखी आहेत...