आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश:पुरामुळे 31 लाख लोक विस्थापित, 26 मृत्यू

ढाका8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशात पुराने हाहाकार उडाला आहे. यामुळे देशातील सुमारे ४० लाख लोक प्रभावित झाले आहेत. ३१ लाख लोक विस्थापित झाले आहेत. पूरग्रस्त भागांतून एक लाखापेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढले, तर २ लाखांपेक्षा जास्त लोकांना सरकारी निवाऱ्यात हलवले आहे. जमालपूर जिल्ह्यात सोमवारी आठ वर्षांच्या मुलीचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. पूर, भूस्खलनामु‌ळे मृतांचा आकडा २६ वर गेला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बांगलादेशात दरवर्षी वाहून जाण्याच्या घटनांत सरासरी १४ लोकांचा मृत्यू होतो.

आसाम : मदतीसाठी गेलेले जवान पुरात बुडाले : आसामच्या नगाव जिल्ह्यात पुरात अडकलेल्यांची मदत करण्यासाठी गेलेले २ पोलिस वाहून गेले. सोमवारी त्यांचे मृतदेह सापडले. पुरामुळे ३४ जिल्ह्यांत ४२ लाख लोक प्रभावित आहेत. आतापर्यंत ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...