आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलमय:ऑस्ट्रेलियात पुराचा कहर, 66 वर्षांचा विक्रम मोडला, दशकातील सर्वात भीषण पूर

कॅनबरा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू साउथ वेल्समधील जलमय कोराकी. - Divya Marathi
न्यू साउथ वेल्समधील जलमय कोराकी.

ऑस्ट्रेलिया दहा दिवसांपासून पुराच्या समस्येला तोंड देत आहे. हा दशकातील सर्वात भीषण पूर असल्याचे सांगितले जाते. पुरामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला. क्वीन्सलँडमधील मुसळधार पावसापासून पुराला सुरुवात झाली. तेथे तीन दिवस संततधार पाऊस कोसळल्याने ब्रिस्बेनचे ७० टक्के क्षेत्र जलमय झाले. दक्षिणेतील सर्वात मोठ्या न्यू साऊथ वेल्समध्ये प्रचंड पाऊस झाला. सिडनीतील सुमारे पाच लाख लोकांना घरेदारे सोडावी लागली. सिडनीमध्ये मंगळवारपर्यंत ८२.१६ सेंमी पाऊस झाला. त्यामुळेच वर्षाच्या सुरुवातीच्या पावसाचा हा विक्रम ठरला आहे. ६६ वर्षांत एवढा पाऊस झाला नाही. १९५६ मध्ये एवढ्या पावसाची नोंद झाली होती. यंदा सुरुवातीला ५० हजारांवर लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या. सिडनीच्या उत्तरेकडील भागात एक डझनाहून जास्त नागरिकांचा बुडून मृत्यू झाला. सिडनीत बुधवारपर्यंत पाऊस मुक्कामी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बचावकार्य मंदावले, दलाकडून माफी

  • ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलाने देशाच्या पूर्व किनारपट्टीवर पूरग्रस्त भागात बचाव कार्य मंदावले याबद्दल माफी मागितली आहे.
  • क्वीन्सलँडमध्ये सुमारे १५ हजार ४०० कोटी रुपयांची हानी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...