आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:पाकमध्ये पूर : मंदिरात 300 मुस्लिमांना भाेजन, निवारा, ​​​​​​​माधाेदास यांची शिकवण

क्वेटा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फाळणीपूर्वीच्या संतांवर मुस्लिम-हिंदूंची श्रद्धा

पाकिस्तानला पुराचा फटका बसला आहे. अनेक लाेक बेघर झाले आहेत. मदतीसाठी लाेक भटकू लागले आहेत. अशा संकट काळात जलाल खान गावातील हिंदू मंदिरांनी सर्वांसाठी आपले दारे खुली केली आहेत. बलुचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील हे लहानसे गाव. या गावातील डाेंगरावरील संत बाबा माधाेदास मंदिर पुराच्या पाण्यापासून सुरक्षित आहे. मंदिरात सुमारे २०० ते ३०० पूरग्रस्तांना निवारा मिळाला आहे. निवाऱ्यासाेबतच त्यांची भाेजनाची देखील व्यवस्था झाली आहे. नारी, बाेलन, लहरी नद्या काेपल्यामुळे जलाल खान गावाचा संपर्क तुटला हाेता. पुराचे पाणी घरात शिरल्याने लाेकांनी आपले बस्तान सुरक्षित ठिकाणी हलवले.

अशा कठीण काळात स्थानिक हिंदू समुदायाने बाबा माधाेदास मंदिराची दारे पूरग्रस्त लाेक तसेच प्राण्यांसाठी खुली केली. बाबा माधाेदास फाळणीपूर्वीचे हिंदू संत हाेते. त्यांच्यावर स्थानिक मुस्लिम तसेच हिंदूंची समान श्रद्धा हाेती. नारी तालुक्याहून नेहमीच या गावी येणारे अल्ताफ बुजदार म्हणाले, आम्ही उंटावरून प्रवास करायचाे. माधाेदास लाेकांकडे कायम मानवतेच्या दृष्टिकाेनातून पाहायचे. बलुचिस्तानच्या हिंदू समुदायाचे पूजेचे ठिकाण नेहमी काँक्रीटचे बनलेले असते. त्याचे बांधकामही माेठे आहे. जलाल खानमधील हिंदू समुदायातील बहुतांश लाेक राेजगार व कामाच्या निमित्ताने इतर शहरात स्थलांतरित झाले आहेत. परंतु काही कुटुंबे या मंदिराच्या देखभालीसाठी परिसरात राहतात. नारी तालुक्यातील ५५ वर्षीय रतनकुमार मंदिराचे प्रभारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...