आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन:पुराच्या पाण्यामुळे 13 मजुरांचा मृत्यू, 75 हजार हेक्टर पिकांची हानी

बीजिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या जुहाई ली शहरात महामार्गावरील बाेगद्यात अडकलेल्या १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने बुधवारी आणखी दहा मृतदेह ताब्यात घेतले आहेत. बाेगद्यात अडकलेल्या एकाही व्यक्तीशी संपर्क हाेऊ शकला नाही. अजूनही बचाव कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. बाेगद्यात पुराचे पाणी भरल्याने लाेक आत अडकले हाेते. दुसरीकडे हेनान प्रांतात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने मृतांची संख्या ३३ झाली आहे. १२ लाेक अजूनही बेपत्ता आहेत. सुमारे २ लाख लाेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हेनान प्रांतातील झेंग्झाे शहरात मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४ तासांत ४५७.५ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली.

बातम्या आणखी आहेत...