आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी पाेलिसांकडून हत्या झालेल्या ४६ वर्षीय कृष्णवर्णीय जाॅर्ज फ्लाॅयड प्रकरणात समेट झाला आहे. त्यानुसार मिनेपाॅलिस सिटी काैन्सिल फ्लाॅयडच्या कुटुंबतयांना २७ दशलक्ष डाॅलर (सुमारे १९६ काेटी रुपये) देणार आहे. या रकमेत ३.६३ काेटी रुपयांच्या मदतीने एक बिझनेस हब तयार केला जाणार आहे. जाॅर्जचा मृत्यू झालेल्या ठिकाणी ते उभारले जाणार आहे.
हे व्यापारी संकुल तयार झाल्यानंतर अनेक लाेकांना राेजगार मिळू शकेल. फ्लाॅयड कुटुंबाचे वकील बेन क्रंप यांनी या कराराची पुष्टी केली आहे. नागरी हक्काच्या दाव्यासाठी हा आजवरचा सर्वात माेठा सामंजस्य करार असल्याचे त्यांनी सांगितले. फ्लाॅयडसाेबत झालेल्या अमानुष कृत्यामुळे मानवतेला धक्का बसला आहे. म्हणून जगभरातील लाेकांनी न्यायाची मागणी केली. त्यातून पाेलिस व न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव वाढला. त्यातून हा करार झाला. कराराबद्दल फ्लाॅयडचे भाऊ राेडनी म्हणाले, अशा प्रकारच्या घटना हाेऊ नये, याची आपण खबरदारी घेतली पाहिजे, हा या करारातून जाणारा संदेश आहे. फ्लाॅयडच्या मृत्यूस कारणीभूत माजी पाेलिस अधिकारी डेरेक चाॅविनवरील खटला सुरू राहणार आहे.
८ मिनिटे मानेला दाबून ठेवले हाेते
पाेलिसांनी गेल्या वर्षी २५ मे राेजी जाॅर्ज फ्लाॅयडला फसवणूक प्रकरणी पाेलिस अधिकारी चाॅविनने फ्लाॅयडला रस्त्यावर पकडले हाेते. नंतर गुडघ्यामध्ये त्याची मान सुमारे ८ मिनिटे धरून ठेवली हाेती. फ्लाॅयडच्या हातात हातकडी हाेती. मला श्वास घेता येत नाही. माझे पाेट दुखत आहे. कृपा करून मला पाणी द्या. मला मारू नका, असे विव्हळत असलेला फ्लाॅयड त्यात दिसताे. नंतर काही क्षणात त्याचा मृत्यू झालेला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.