आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:गर्भनिराेधकाऐवजी फ्लूचे इंजेक्शन; महिलेने दिव्यांग मुलीला दिला जन्म, सरकारला ७४ काेटींचा दंड!

सिएटल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिएटलची घटना; न्यायालयाने परिचारिकेच्या चुकीबद्दल सरकारला ठरवले दाेषी
  • २०११ मध्ये सरकारी रुग्णालयात घेतले होते उपचार

अमेरिकेतील सिएटलच्या न्यायालयाने एका दिव्यांग मुलीच्या कुटुंबाला १ काेटी डाॅलरचा (सुमारे ७४ काेटी रुपये) दंड ठाेठावला. नऊ वर्षांपूर्वी मुलीची आई गर्भनिराेधक इंजेक्शन घेण्यासाठी गेली हाेती, परंतु परिचारिकेने फ्लूचे इंजेक्शन दिले हाेते. पुढे ही महिला गराेदर राहिली आणि तिने दिव्यांग मुलीला जन्म दिला. चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा जन्म झाला. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे मुलीचा जन्म झाल्याचे सांगून न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

त्यानुसार १ काेटी डाॅलरपैकी ७५ लाख डाॅलर (सुमारे ५५ काेटी रुपये) मुलीला देण्याचे निर्देश दिले. २५ लाख डाॅलर (सुमारे १८ काेटी रुपये) मुलीच्या आई-वडिलांना देण्यात येणार आहेत. हे पैसे मुलीवरील उपचार, शिक्षण व इतर खर्चासाठी दिले जात असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. मुलीची आई येसेनिया पचेकाे १६ व्या वर्षी अल सॅल्वाडाेरमधून अमेरिकेत बेकायदा स्थलांतरित झाल्या हाेत्या. त्या दाेन मुलांच्या आई हाेत्या. त्यांना तिसरे मूल नकाे हाेते. त्यासाठी त्या नियमित गर्भनिराेधक इंजेक्शन घेत हाेत्या. २०११ मध्ये त्या दर तीन महिन्याला गर्भनिराेधक इंजेक्शन घेण्यासाठी जवळील सरकारी रुग्णालयात जात. परंतु तेथे परिचारिकेने तिला चुकीचे इंजेक्शन दिले. न्यायाधीशांनी परिचारिकेच्या या चुकीबद्दल केंद्र सरकारला दाेषी ठरवले आणि १ काेटी डाॅलरचा दंड देण्याचा आदेश दिला. सरकारची बाजू मांडणारे वकील म्हणाले, आम्हाला मुलीच्या दिव्यांगतेचा स्तर जाणून घ्यायचा हाेता. आम्ही काेर्टाचा निर्णय स्वीकारताे आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्याची कामना करताे.

मुलीच्या कुटुंबाला पाच वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मिळाला न्याय येसेनियाला सुमारे पाच वर्षे कायदेशीर लढाई लढल्यानंतर आता कुठे न्याय मिळाला. येसेनिया म्हणाल्या, माझे मूल गंभीर स्वरूपाने दिव्यांग म्हणून जन्माला आले. तिच्यावरील उपचारासाठी कुटुंबाला दर महिन्याला माेठी रक्कम खर्च करावी लागते. पीएमजी नावाच्या जन्मजात आजाराने ही मुलगी ग्रस्त आहे. आता ही मुलगी आठ वर्षांची आहे. तिसऱ्या वर्गात शिकते. आजारपणामुळे तिला नीटपणे बाेलता येत नाही. त्याशिवाय तिला मिर्गी, दृष्टीसंबंधीही आजार आहे.

बातम्या आणखी आहेत...