आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये ब्रेक्झिट व कोरोना महामारीनंतर राष्ट्रीय पातळीवर ट्रक चालकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याच्या उपलब्धतेचे संकट निर्माण झाले आहे. सुपरमार्केट रिकामे आहेत. पेट्रोल पंप व गॅस स्टेशन बंद होत आहेत. लोक आणीबाणीच्या परिस्थितीसारखी घाईघाईने खरेदी करू लागले आहेत. आगामी काळात संकट आणखी वाढू शकते, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यातच ब्रिटनमध्ये एक लाख ट्रक चालकांचा तुटवडा जाणवत आहे.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील वितरण प्रणाली कोलमडली आहे. ती सुरळीत करण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाऊ शकते. हे सैनिक देशभरात खाद्य-पदार्थ, तेल व इतर गरजेच्या वस्तूंची पुर्तता करतील. १७ वर्षांपासून ट्रक चालक असलेले बॅरी म्हणाले, ब्रिटनमध्ये बहुतांश ट्रक चालक युरोपीय देशांतून येत होते. परंतु ब्रेक्झिटनंतर त्यांना मायदेशी परतावे लागले. परिणामी ट्रक चालकांची संख्या कमी झाली. ब्रिटनमध्ये कोरोना महामारीच्या काळात हजारो चालक बाधित झाले. त्यानंतर अनेक चालकांनी नोकरी सोडली व ते परदेशात निघून गेले. हे देखील तुटवड्याचे कारण मानले जाते. फेडरेशन ऑफ होलसेल डिस्ट्रिब्यूटर्सचे सीईआे जेम्स बीएलबीने चालकांची संख्या कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, या समस्येचा परिणाम वस्तूंच्या दरवाढीत दिसून येऊ शकतो.
वार्षिक ७८ लाख रुपये देऊनही चालक मिळेना
ब्रिटिश कंपन्या ६३ हजार पाउंड (सुमारे ६३ लाख रुपये) ते ७८ हजार पाउंड (सुमारे ७८ लाख रुपये) पर्यंत वार्षिक वेतन देण्यास तयार आहेत. लिंकनशायरच्या एका भाजीपाल्याच्या फर्मचे संचालक म्हणाले, आम्ही चालकास ताशी ३० पाउंड (सुमारे ३०३० रुपये) देण्याबद्दलची जाहिरात काढली, तरीही चालक मिळाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.