आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारीचा फटका:प्रत्येक सहाव्या अमेरिकी व्यक्तीवर अन्नान्नदशा, मंदीपेक्षा वाईट स्थिती! 5 काेटींहून जास्त लाेकांवर संकट

न्यूयाॅर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील सर्वात माेठ्या अर्थव्यवस्थेत वाढले संकट

काेराेना महामारीमुळे अनेक देश व तेथील नागरिकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अर्थव्यवस्थेचा आकार पाहता जगातील सर्वात समृद्ध देश अमेरिका त्याला अपवाद नाही. महामारीमुळे तेथे माेठ्या प्रमाणात बेराेजगारी वाढली आहे. त्यातून उपासमारीचे संकट आेढवले आहे. भुकेलेल्यांना मदत करणारी फिडिंग अमेरिका संस्थेच्या म्हणण्यानुसार डिसेंबरअखेर ५ काेटींहून जास्त लाेकांवर हे संकट आले हाेते. अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला हाेता. म्हणजे तेव्हा प्रत्येकी सहा अमेरिकी उपासमारीचा सामना करत हाेता. मुलांच्या बाबतीत तर परिस्थिती आणखी वाईट आहे. प्रत्येक चाैथे अमेरिकी मूल उपासमारीला ताेंड देत आहे.

अहवालानुसार जूनपासूनच अमेरिकेत अशा गरजूंची संख्या प्रचंड वेगाने वाढली. संपूर्ण देशात अशा गरजूंची संख्या महामारीच्या आधीच दुपटीवर झाली. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. मुलांची संख्या तीनपटीने वाढली. फिडिंग अमेरिका नेटवर्कने एक महिन्यात ५४.८ काेटी खाद्यपदार्थाच्या पाकिटांचे वाटप केले. महामारी सुरू हाेण्यापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण ५२ टक्के जास्त आहे. अन्नपदार्थाचे वितरण हाेत असलेल्या ठिकाणी लांबच लांब रांगा दिसत आहेत. संस्थेद्वारे नाताळच्या आधी दरवर्षी सरासरी ५०० लाेकांना खाद्यपदार्थ पुरवले जात. यंदा हा आकडा वाढून ८ हजार ५०० झाला आहे. अशाच प्रकारे शहरांतील संख्या वाढली आहे.

कम्युनिटी फ्रिजच्या साहाय्याने लाेकांना मोफत अन्नपुरवठा
अन्न संकटाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील लाेक आता परस्परांना मदत करत आहेत. सरकारी मदतीत विलंब हाेत असल्याने लाेकांनी हे पाऊल उचलले. अनेक ठिकाणी लाेकांनी कम्युनिटी फ्रिज लावले आहेत. अन्नपदार्थ नसलेल्यांना फ्रिजमधून माेफत भाेजन दिले जात आहे. एका फ्रिजची जबाबदारी दाेन लाेकांवर साेपवली आहे. त्याशिवाय व्हाॅट्सअॅप व फेसबुक ग्रुपच्या साहाय्याने उपासमार हाेत असलेल्या लाेकांना मदत केली जात आहे. स्वयंसेवी संस्थाही या सहभागी झाल्या.

श्रीमंतांचे शहर न्यूयाॅर्कमध्येही समस्या, ७.७ कोटी पाकिटे वाटप
न्यूयाॅर्कमध्ये १.२० लाख लाेकांकडे ५० लाख डाॅलर (सुमारे ३६ काेटी रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. श्रीमंतांचे शहर असतानाही शहरावर उपासमारीचे संकट आहे. महामारीदरम्यान न्यूयाॅर्क फूड बँकेने ७.७ काेटी खाद्यपदार्थांची पाकिटे वाटली. इतर वर्षाच्या तुलनेत ७० टक्के जास्त. कृष्णवर्णीय समुदायातील लाेकांची स्थिती तर आणखी वाईट आहे. अनेक चर्चनी या समुदायाच्या मदतीसाठी भाेजनाची व्यवस्था केली आहे. परंतु ही दैनंदिन समस्या बनली आहे.

बातम्या आणखी आहेत...