आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जर्मनीचा फुटबॉल क्लब बायर्न म्युनिचने सलग आठव्यांदा घरचा किताब जिंकला. बायर्न म्युनिचने बुंदेसलिगामध्ये वेर्डर ब्रेमेनला १-० ने हरवले. त्यांच्याकडून राॅबर्ट लेवानडोस्कीने ४३ व्या मिनिटाला गोल केला. त्याचे लीगमध्ये चालू सत्रात ३१ गोल झाले. बायर्नचे लीगमधील दोन सामने बाकी आहेत. टीम पहिलेच चॅम्पियन बनली. विजयानंतर खेळाडूंनी ४२ हजार क्षमता असलेल्या रिकाम्या वेसेर स्टेडियममध्ये जल्लोष केला. बायर्नने ३२ सामन्यांत ७६ गुण मिळवले. दुसऱ्या स्थानावरील बोरुसिया डॉर्टमंड (६६) आहे. युरोपच्या कोणत्याही अव्वल ५ लीगमध्ये सलग ८ किताब जिंकणारी बायर्न दुसरी टीम बनली आहे. यापूर्वी, युवेंट्सने इटालियन लीग सीरी ए मध्ये २०११-१२ ते २०१८-१९ दरम्यान सलग आठ वेळा किताब जिंकला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.