आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • For The First Time, A Team Of 10 Women Scientists Spent Three Months Researching In Sea, Also Discovering Algae Species, That Will Help With Climate Change.

दिव्य मराठी विशेष:प्रथमच 10 महिला वैज्ञानिकांच्या चमूचे समुद्रात तीन महिने संशोधन, शेवाळाच्या प्रजातीही शोधल्या, त्या हवामान बदलांवर करतील मदत

कॅलिफोर्नियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 71 वर्षांपासून सुरू आहे ‘कॅलिफोर्निया को-ऑप ओशनिक फिशरीज इन्व्हे.’ची मोहीम

अमेरिकेत ‘कॅलिफोर्निया को-ऑपरेटिव्ह ओशनिक फिशरीज इन्व्हेस्टिगेशन’ (कॅलकोफी) गेल्या ७१ वर्षांपासून समुद्र आणि समुद्रात आढळणाऱ्या माशांवर संशोधन करत आली आहे. १९४९ मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम अमेरिकेतील सागरी शास्त्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा मानला जातो. त्यासाठी स्थापन करण्यात आलेला संशोधन चमू तीन महिने जहाजात राहून समुद्रात खोलवर जाऊन अनेक आवश्यक गोष्टींची माहिती घेतो. जुलैत रवाना झालेला चमू १५ सप्टेंबरला परत आला तेव्हा त्याने एक विक्रम रचला. हा अमेरिकेच्या सागरी संशोधनाच्या इतिहासातील असा चमू होता, ज्यात सर्व १० सदस्य महिला होत्या.

महिला वैज्ञानिकांच्या चमूने प्रशांत महासागरात विविध प्रकारच्या सागरी शे‌वाळांच्या प्रजातींचा शोध लावला. त्यांची समुद्रात वेगाने वाढ होते. हे शे‌वाळ सूर्यप्रकाशाद्वारे ऊर्जा आणि समुद्राच्या पाण्यातून पौष्टिक तत्त्व तसेच कार्बन डायऑक्साइड घेतात. या चमूतील एक सदस्य लिली यांनी सांगितले की, सागरी शेवाळ हवामान बदलाशी लढा देण्यास उपयुक्त ठरू शकतात आणि कार्बन उत्सर्जनाची भरपाईही करू शकतात. वैज्ञानिकांच्या चमूच्या प्रमुख २९ वर्षीय अँजिला क्लेम्डसन यांनी या जहाजाचे नाव अमेरिकेच्या पहिल्या महिला अंतराळवीर ‘सॅली राइड’ यांच्या नावावर ठेवले. महिलांची शक्ती सिद्ध करता यावी हा त्यामागील हेतू होता. या चमूने तीन महिन्यांत अनेक महत्त्वाचे शोध लावले आणि अनेक नमुने तसेच डेटा जमा केला. वैज्ञानिक विश्लेषणानंतर त्याचा निकाल जाहीर केला जाईल. अँजिला क्लेम्डसन म्हणाल्या, “मोहिमेला मिळालेल्या यशामुळे मी आनंदी आहे. आम्ही प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही. कोरोना साथरोगाच्या काळातील हा आमचा पहिला प्रवास होता. आम्ही सर्वांनी प्रोटोकॉलचे कडक पालन केले. कुणीही आजारी पडले नाही.

समुद्रात आढळलेले पायरोझोम्स आणि हिरवे पाणी यांचा संबंध शोधणार

लिली यांनी सांगितले की, “२०१४ मध्येही कॅलकॉफीच्या चमूला प्रशांत महासागरातील गरम आणि स्थिर पाण्यात अशाच प्रकारचे पायरोझोम्स दिसले होते. महासागराचे हिरवे पाणी आणि पायरोझोम्सची एवढ्या मोठ्या संख्येतील उपस्थिती यांचा परस्परांशी काय संबंध आहे आणि समुद्रावर त्याचा काय परिणाम होतो हे आता आम्ही शोधून काढणार आहोत.”