आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time Ever, The Public Will Choose A Word Of The Year; Combat In Metaverse, Eistandwith, Goblin Mode

ऑक्सफर्डचा पुढाकार:प्रथमच लोक निवडणार वर्ड ऑफ द इयर; मेटाव्हर्स, आयस्टँडविथ, गॉब्लिन मोड या शब्दांत मुकाबला

लंडन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्सफर्डने वर्ड ऑफ द इयरची निवड करण्यासाठी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकांना मेटाव्हर्स, आयस्टँडविथ, गॉब्लिन मोड या तीनपैकी एका शब्दाची निवड करता येईल. ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी वर्ड ऑफ द इयरची घोषणा करते. यंदा पहिल्यांदाच लोकांना या श्रेणीत शब्दाची निवड करण्याची संधी मिळाली आहे. ऑक्सफर्ड लँग्वेजच्या languages.oup.com/word-of- the- year/ या संकेतस्थळावर पसंतीच्या शब्दाला २ डिसेंबरपर्यंत आपला कौल देता येईल. आतापर्यंत अडीच लाख लोक त्यात सहभागी झाले आहेत. ऑक्सफर्डच्या म्हणण्यानुसार मेटाव्हर्समध्ये आम्ही भविष्यातील अनेक संकल्पना पाहतो. व्हर्च्युअल रि-लिटीमध्ये काम करण्यापासून भविष्यातील संपूर्ण ऑनलाइनपर्यंत होणाऱ्या चर्चेपर्यंत मेटाव्हर्स शब्दाचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत चारपटीने वाढला आहे. आयस्टँडविथ शब्दाचा वापर सोशल मीडियात एखादी व्यक्ती किंवा उद्देशाच्या समर्थनार्थ आपले विचार व्यक्त करण्यासाठी होतो. मग ते रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप-अम्बर हर्डचे प्रकरण. हा शब्द सामाजिक क्षेत्रात सक्रिय व्यक्तींच्या विचारांशी संबंधित आहे. गॉब्लिन मोडचा अर्थ समाजाच्या आशा-आकांक्षांना नाकारून मनाला वाटेल ती कामे करणे होय. २००९-१० मध्ये हा शब्द प्रचलित झाला.

गेल्या वर्षी वॅॅक्स वर्ड ऑफ द इयर, २०१५ मध्ये इमोजी गेल्या वर्षी वॅॅक्स वर्ड ऑफ द इयर होता. हे वर्ष एखाद्या शब्दात सामावले जाऊ शकत नाही, असे ऑक्सफर्डने २०२० मध्ये म्हटले होते. २०१९ मध्ये क्लायमेट इमर्जन्सी, २०१८ मध्ये टॉक्सिक, २०१७- यूथक्विक, २०१६- पोस्ट ट्रूथची निवड झाली होती. २०१५ मध्ये आनंदी आणि दु:खी इमोजीची निवड झाली होती.

बातम्या आणखी आहेत...