आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • For The First Time In 116 Years In The United States, Who Will Be The Next President After The Election This Year Will Not Know!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका अध्यक्ष निवडणूक:अमेरिकेत 116 वर्षांत प्रथमच यंदा मतदानानंतर दुसऱ्या दिवशी अध्यक्ष कोण हे कळणार नाही!

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वेळी विक्रमी 9.80 कोटी म्हणजे सुमारे 50% मतदारांचे आधीच टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान सुरू झाले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी पहाटे ६ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी ४.३० वाजता) मतदानास सुरुवात झाली. रात्री ९ वाजेपर्यंत (बुधवारी सकाळी ७.३०) सुरू राहील. या वेळी मतदारांच्या केंद्रांवर रांगा दिसून आल्या. या वेळी विक्रमी ९.८० कोटी म्हणजे सुमारे ५०% मतदारांनी आधीच टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे. यामुळे निवडणूक निकाल जाहीर होण्यात उशीर होऊ शकतो. पहिला निकाल बहुतांश राज्यांत मतदान पूर्ण होताच बुधवारी पहाटे ५ वाजता हाती येऊ शकतो. मात्र, अध्यक्ष कोण, हे कळण्यास १९०४च्या निवडणुकीपासून मतदान झालेल्या दिवशीच रात्री अध्यक्ष कोण हा कल स्पष्ट होतो. यात विशेषत: फ्लोरिडात ज्यांना पाठिंबा मिळेल, तोच अध्यक्ष होतो, अशी परंपरा आहे. मात्र, यंदा यासाठी बराच वेळ लागू शकतो. टपाली मतदान आणि प्रत्यक्ष मतदानाची मोजणी होण्यासाठी कदाचित एक आठवड्याचा कालावधीही लागू शकतो. त्यामुळे ११६ वर्षांत प्रथमच मतदानाच्या दिवशी रात्री देशाचा अध्यक्ष कोण हे सांगणारी परंपरा खंडित होऊ शकते.

मुख्य लढत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात आहे. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस आणि रिपब्लिकनचे माइक पेन्स रिंगणात आहेत.