आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time In 400 Years, Rainwater Only Flooded, An Emergency In New York; Floods Hit 6 Crore People

न्यूयॉर्क:400 वर्षांत प्रथमच, पावसाने पाणीच पाणी, न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी; 6 कोटी लोकांना पुराचा फटका, 3 लाख घरे अंधारात

न्यूयॉर्क14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत चार दिवसांपूर्वी धडकलेल्या इडा चक्रीवादळाने थैमान घातले आहे. हे वादळ लुइसियानाहून न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेन्सिल्व्हेनिया राज्यापर्यंत जाऊन धडकले आहे. त्याचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क सिटीला बसला आहे. एका रात्रीत सुमारे ४ इंचांपर्यंत पावसाची नोंद झाली. न्यूयॉर्कमध्ये ४०० ते ५०० वर्षांनंतर एवढा मुसळधार पाऊस झाला. परिस्थिती लक्षात घेऊन न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच आणीबाणी लागू करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या उपनगरांत पाणीच पाणी झाले आहे. बहुतांश मेट्रो बंद आहेत. एमटीएस मार्ग ठप्प आहे. बसमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये ९ तर देशभरातील विविध दुर्घटनांत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. ९ जण गंभीर जखमी आहेत. अनेक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. देशात सुमारे ६ कोटी लोक पुराशी झुंज देत आहेत. १२ लाखांहून जास्त लोक अंधारात आहेत. तीन लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन
न्यूयॉर्कचे महापौर डी ब्लासियो यांनी गुरुवारी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भयंकर पूर व रस्त्यावर धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन सर्व लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे. रस्त्यावरून दूर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...