आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माद्रिद:70 वर्षांत प्रथमच स्पेनचा विक्रमी बर्फवृष्टीशी सामना

माद्रिद / कियारा कोलासंटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र स्पेनमधील फुटबॉल क्लब रिअल माद्रिदचे मैदान सेंटियागो बर्नबेउचे आहे. - Divya Marathi
छायाचित्र स्पेनमधील फुटबॉल क्लब रिअल माद्रिदचे मैदान सेंटियागो बर्नबेउचे आहे.

स्पेनची कल्पना केल्यानंतर उष्ण वातावरणात किनारी बसलेल्या लोकांचे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र बर्फाळ वादळ फिलामेनामुळे माद्रिदमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे. येथे २४ तासांत २० इंच बर्फवृष्टी झाली आहे. मेयर ऑफिसनुसार, बर्फवृष्टीमुळे माद्रिदचे १२ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. हा बर्फ वितळवण्यासाठी ७ हजार टन मिठाचा वापर केला जात आहे. स्पेन आतापर्यंतच्या सर्वात भीषण थंडीचा सामना करत आहे.

माद्रिदशिवाय बार्सिलोनाजवळ असलेल्या अल कोटामध्ये पारा उणे ३४ तर व्हेगा डी लियोर्ड्समध्ये उणे ३५.६ अंशावर घसरला आहे. हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. यापूर्वी १९५६ मध्ये पिरिनी माउंटेन रेंजमधील जेनटो लेकमध्ये उणे ३२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. बर्फाळ वादळामुळे २७ राज्यांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. माद्रिदमध्ये आणीबाणीसारखी स्थिती आहे.