आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात अवयवदानाची अनोखी घटना समोर आली आहे. येथे एक व्यक्ती जेफरी ग्रँगरला महिला टॅरी हेरिंग्टनने आपली किडनी दान केली. या आधी जेफरीचे २००४ मध्ये अवयव प्रत्यारोपित करण्यात आले होते. योगायोगाने ते अवयव टॅरीचे पती ब्रायन हेरिंग्टनचे होते. पेन्सकोलात राहणाऱ्या हेरिंग्टनचा २००४ मध्ये इमारत कोसळल्याने मृत्यू झाला होता. ते छत दुरुस्तीचा व्यवसाय करायचे. मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्यात यावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार राज्यातीलच जेफरी ग्रँगरला त्यांची किडनी आणि पँक्रियाज प्रत्यारोपित करण्यात आले होते. दोन अवयव दुसऱ्याला देण्यात आले. नियमांनुसार जेफरीला सांगण्यात आले नाही की त्यांना कोणाचे अवयव लावण्यात आले आहेत. त्यानंतर टॅरीनेच जेफरीला सांगितले की, तिच्या पतीच्या अवयवांमुळे त्याला नवे आयुष्य मिळाले आहे. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. पुढची १५ वर्षे ती आणखी दृढ झाली. २०१९ जेफरीची दुसरी किडनी खराब झाली. सोशल मीडियावर जेफरीने किडनी डोनेशनसाठी आवाहन केले. टेरीला याबाबत समजल्यावर तिने किडनी दान देण्याची तयारी दर्शवली. दोघांची किडनी जुळवून बघण्यात आली. आश्चर्य म्हणजे ती मॅच झाली. टॅरीची किडनी मिळाल्यानंतर जेफरी बरा होत आहे.
१५ वर्षे वाढले जेफरीचे आयुष्य
टॅरी आणि जेफरीची शस्त्रक्रिया करणारे डॉ. मार्क जॉन्सन सांगतात की, या शस्त्रक्रियेनंतर जेफरीच्या आयुष्याचे जवळपास १४-१५ वर्षे वाढली आहेत. माझ्या पूर्ण कार्यकाळात असे पहिल्यांदाच झाले की, दांपत्याचे अवयव एकाच व्यक्तीला प्रत्यारोपित करण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.