आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेजगार:ब्रिटनमध्ये काेराेनाकाळात पहिल्यांदाच 10 लाखांवर राेजगार उपलब्ध, वेतनही पूर्वीसारखे

ब्रिटनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना महामारीपासून बचावासाठी लसीकरणादरम्यान ब्रिटनमधून एक चांगली बातमी आहे. कंपनीतील कामगारांचे वेतन आता काेराेनाच्या पूर्वीसारखे किंवा त्यापेक्षा वरच्या श्रेणीत पाेहाेचले आहे. ब्रेक्झिट व लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेल्या कारखान्यांनी नियुक्त्यांसाठी तयारी दाखवली आहे. लाेकांना हवे तेवढे वेतन देण्याचीही कंपन्यांची तयारी आहे. परंतु कंपन्यांना कामगार मिळत नसल्याचे दिसून येते. आॅफिस फाॅर नॅशनल स्टॅटिक्सच्या (आेएनएस) आकडेवारीनुसार तिमाहीत राेजगारात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपन्यांत किमान २,४१,००० कामगारांचे वेतन आॅगस्टमध्ये वाढले. नव्या राेजगाराची संख्या १० लाखांहून जास्त झाली आहे. काेराेना काळात राेजगार एवढ्या माेठ्या संख्येने उपलब्ध हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या राेजगाराची संख्या १० लाखांहून जास्त आहे. त्यावरून विषाणूच्या काळातही बाजारपेठेत गती आल्याचे दिसते. बाजारात उत्साह दिसून येताे. कामगाराच्या तुटवड्याची समस्या सर्वच क्षेत्रांत जाणवू लागली आहे. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार राेजगाराच्या निर्मितीतून बाजारपेठ बळकट हाेत असल्याचे संकेत मिळतात. अशा परिस्थितीत बँक आॅफ इंग्लंड पुढील वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत व्याजदर वाढीबाबत विचार करू शकते. कंपन्यांचे कार्यकारी समूहाचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ किटी उशर यांच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत पाेहाेचली आहे. सुट्या संपताच अर्थव्यवस्थेला गती येईल.

रिक्त जागा भरतील की नाही? कंपन्यांना चिंता
कामगार नाेकरीवर परततील की नाही? सध्या उपलब्ध लाेकांचे प्रमाण कमी आहे. देशात ६० लाखांवर लाेक आजारी किंवा त्यातून सावरले नसल्याची सबब देऊन कामावर येत नाहीत. ब्रिटनमध्ये सर्वाधिक राेजगार घरांचे बांधकाम, खाद्यसेवेशी संबंधित क्षेत्रात निर्माण हाेतात. त्यानंतर आराेग्य, सामाजिक कार्य, रिटेल, व्यावसायिक वैज्ञानिक, तंत्रज्ञ, वाहतूक-गाेडाऊन, प्रशासन, मॅन्युफॅक्चरिंग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांतही ४० हजार जागा रिक्त आहेत. सर्वात कमी नाेकऱ्या पाणीपुरवठा, स्वच्छता क्षेत्रात दिसून येतात.

बातम्या आणखी आहेत...