आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • For The First Time In Britain, The Indian Community Is Now Being Studied Through An Independent Census

दिव्य मराठी विशेष:ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच भारतवंशीय समुदायाचा आता स्वतंत्र जनगणनेद्वारे अभ्यास, १८ लाखांवर लाेकांचे वास्तव्य !

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 104 वर्षे जुन्या इंडिया लीग आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीसाेबत आॅनलाइन हाेणार प्रक्रिया

ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच भारतवंशीय समुदायाची स्वतंत्र जनगणना हाेणार आहे. १९१६ मध्ये म्हणजे १०४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली इंडिया लीग ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ब्रिटिश-भारतीयांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या इंडिया लीगसाठी आॅक्सफर्ड विद्यापीठासह मिळून आॅनलाइन जनगणना करणार आहे.

जनगणनेनंतर वर्षअखेरीस पहिला ब्रिटिश-भारतीय अहवाल तयार हाेणार आहे. २०२० मध्ये ब्रिटनचे अनिवासी भारतीय, मुद्दे व या समुदायाबद्दलची माहिती या अहवालातून मिळेल. ब्रिटनमध्ये मीडियातील प्रतिष्ठित व इंडिया लीगचे अध्यक्ष सी.बी. पटेल म्हणाले, ब्रिटिश-भारतीय समुदायात खूप बदल झाले आहेत. ही पाहणी आमच्या समुदायाला खूप महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देणार आहे. आमच्याशी संबंधित मुद्दे व त्याच्या निराकरणासाठी ही पाहणी महत्त्वाची ठरेल.

हाऊस आॅफ लाॅर्ड‌्सचे सदस्य व इंडिया लीगचे सल्लागार संदीप वर्मा म्हणाले, काेविड-१९ महामारीने ब्रिटिश-भारतीय समुदायासह (कृष्णवर्णीय, आशियाई, अल्पसंख्याक) या वर्गातील काही आराेग्य तसेच सामाजिक भेदभावांचाही पर्दाफाश झाला आहे. काही प्रमाणात त्याला वाढवले. हे संशाेधन आम्हाला आमच्या समुदायातील वैविध्य लक्षात घेण्यासाठी मदत करू शकेल. त्याशिवाय धाेरणांचा विकास करणे व जीवन समृद्ध करण्याचेदेखील माध्यम ठरू शकते. ब्रिटनमध्ये भारतवंशीय १८ लाखांहून जास्त लाेक आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील आकडे स्पष्ट करतात. ब्रिटनची एकूण लाेकसंख्या सुमारे ३ टक्के आहे. ब्रिटनमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आशियाई वंशाचे ५ टक्के लोक राहतात.

ऑगस्टमध्ये पूर्ण होणार जनगणना, दर २-३ वर्षांत योजना
जनगणनेचा उद्देश ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाचा वारसा, आेळख, धार्मिक मान्यता, विश्वास, व्यवहार यांच्यातील विविधतेचा शोध घेणे होय. सामाजिक व न्यायिक पद्धतींद्वारे सोडवणूक हाेऊ शकते, अशा समस्याही जाणून घेतल्या जातील. जनगणना ऑगस्टमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.