आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time In Britain's 500 year History, The Royal Navy Has A Female Rear Admiral; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:ब्रिटनमध्ये रॉयल नेव्हीच्या 500 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला रिअर अॅडमिरलपदी विराजमान

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला सशक्तीकरणात पुढचे पाऊल; नौदलात समावेश, लष्करात आधीच जबाबदारी
  • ज्यूड टेरी पदभार सांभाळणार, 19 वर्षांच्या करिअरमध्ये यश

ब्रिटनने महिला सशक्तीकरणाची वाटचाल सुरू ठेवली अाहे. रॉयल नेव्हीत पहिल्यांदाच महिला रिअर अॅडमिरल पदाची घोषणा केली आहे. ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला रिअर अॅडमिरल बनवण्यात आले आहे. आता ज्यूड टेरी (४७) हे पद सांभाळतील. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल. हे पद लष्करातील मेजर जनरल व हवाई दलातील व्हाइस मार्शलच्या समकक्ष आहे. ब्रिटनमध्ये लष्कर तसेच हवाई दलात या पदांवर पूर्वीच महिला आहेत.

रिअर अॅडमिरल ज्यूड यांच्यावर नौदल सैनिक, नाविकांची नियुक्ती, सेवानिवृत्तीच्या कार्याची जबाबदारी राहील. त्या नौदल सैनिक व नाविकांचे प्रशिक्षण, कल्याण व करिअर व्यवस्थापनाची देखील देखरेख करतील. ज्यूड नौदलाच्या परिवहन जहाज एचएमएस आेशियनमध्ये तैनात होत्या. हे जहाज ब्रिटिश नाैदलाचा हेलिकॉप्टरचे लँडिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्यूड यांच्यावर याच जहाजाच्या ताफ्याची जबाबदारी होती. ज्यूड चॅनल-४ च्या युद्धनौकांच्या निर्मितीच्या टीमच्या प्रमुख राहिल्या आहेत. त्यांचा जन्मू जर्सी शहरातील आहे. सैन्याद्वारे देशाची सेवा करण्याची प्रेरणा त्यांना वडिलांकडून मिळाली.

ज्यूड यांचे वडील रॉबिन रॉयल नेव्हीचे जहाज एचएमएस टायगरमध्ये अधिकारी होते. ज्यूड यांनी १९९७ मध्ये पदवी घेतली होती. त्यांनी ब्रिटानिया रॉयल नेव्हल महाविद्यालयातून शिक्षण घेतले. त्यांनी संरक्षण क्षेत्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. रॉयल नेव्हीमध्ये सध्या ३० हजार अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यापैकी १२ टक्के महिला आहेत. २०३० पर्यंत हे प्रमाण ३० टक्क्यांवर नेेले जाणार आहे. रिअर अॅडमिरलचे पद व्हाइस अॅडमिरल व अॅडमिरलच्या खालोखाल असते. परंतु कॅप्टन व कमोडरपेक्षा ही उच्च श्रेणी आहे.

नौदलात माझ्यासोबत कधीही भेदभाव झाला नाही : ज्यूड
या सन्मानामुळे मी आनंदी आहे. नौदलात माझा नेहमीच सन्मान झाला. महिला असल्याने मला कधीही भेदभावाची वागणूक मिळाली नाही. निश्चितच आपल्याला आपल्या कामाचे फळ कधी ना कधी मिळत असते. या यशामध्ये माझ्या आई, बहिणीचे सर्वात मोठे योगदान मानते. त्यांनी मला योग्य मार्ग दाखवला. सैन्याने समाजाबद्दल जबाबदार बनवण्याची इच्छा आहे, असे ज्यूड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...