आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time In Egypt, Ordinary Women Suffered; Investigating Officers Sexually Abuse Under Investigation; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​इजिप्तमध्ये पहिल्यांदाच सामान्य महिलांनी मांडली व्यथा; चौकशीच्या आडून तपास अधिकारी करतात लैंगिक शोषण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस ठाण्यापासून तुरुंग, सरकारी रुग्णालये सर्व ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित

२९ वर्षीय अस्मा अब्देल हमीदला कैराेमधील भाडेवाढीच्या विराेध करण्यासाठी निदर्शन करताना अटक झाली हाेती. त्यांचे तीन ठिकाणी लैंगिक शाेषण झाले. पहिल्यांदा पाेलिस काेठडीत, दुसऱ्यांदा सरकारी रुग्णालयात आणि ितसऱ्यांदा तुरुंगात तिचे शाेषण झाले. तिन्ही वेळेला त्यांना विवस्त्र हाेण्यासाठी बळजबरी करण्यात आली हाेती. २०१८ मध्ये अटकेतील अब्देलवर दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवणे आणि सार्वजनिक परिवहन यामध्ये अडथळा आणण्यासाठी दाेषी ठरवण्यात आले. इजिप्तमध्ये अशा एक नव्हे, शेकडाे महिला आहेत. त्यांना सरकारला विराेध केल्यावरून अटक झाली हाेती किंवा अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडायला गेल्यावर त्यांचे लैंगिक शाेषण झाले.

सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लाेकांनीच त्यांना शिकार केले हाेते. वर्षानुवर्षे महिलांचे अशा प्रकारे शाेषण केले जात आहे. लैंगिक शाेषणाच्या विराेधात पहिल्यांदाच इजिप्तमधील महिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिकाऱ्यांनी आपले शाेषण केल्याचा आराेप सर्व महिलांनी केला. पाेलिस ठाणे, तुरुंग किंवा रुग्णालय असाे महिला कुठेही सुरक्षित नाहीत. पाेलिस किंवा सुरक्षा रक्षक नियमित चाैकशीसाठी आले हाेते. तेव्हा हे गुन्हे घडल्याचा अनुभव पीडितांनी सांगितला. शारीरिक तपासणीसाठी आलेल्या महिलांचेही डाॅक्टरांनी शाेषण केल्याच्या घटना घडल्या.

इजिप्तमध्ये अशा गुन्ह्यांचा काहीही डेटा नाही. कारण, देशात अशा प्रकारच्या लैंगिक शाेषणाच्या तक्रारीची कसलीही पद्धत नाही. सामान्यपणे अशी तक्रार दाखल केल्यानंतर कुटुंब महिलांना साेडून देतात किंवा त्यांना अपमानित करतात. परंतु अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत असल्याचा दावा पाेलिस, तज्ञांनी केला आहे. ही गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. अशा पीडित महिलांनी आपली आेळख लपवून हकिगत सांगितली. आेळख स्पष्ट झाल्यास आपल्याला अटक केली जाईल, अशी भीती त्यांना वाटते.

२०११ मध्ये न्यायालयाने राेखले, व्हर्जिनिटी टेस्टसाठी बळजबरी
इजिप्तच्या एका न्यायालयाने २०११ मध्ये व्हर्जिनिटी टेस्टसाठी महिलांवर शारीरिक अत्याचार केले जात असल्याचे नमूद केले हाेते. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये मानवी हक्क संस्थेच्या अहवालातून हा दावा करण्यात आला. पाेलिसांच्या चाैकशीच्या फेऱ्यातील प्रत्येक महिलेचे शाेषण केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...