आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वर्ड विद्यापीठ:386 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कृष्णवर्णीय अध्यक्ष, भेदभावाच्या मुद्द्यांवर देतात भर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डीन यंाच्या रूपात क्लॉडीन गे यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. आफ्रिकन-अमेरिकन स्टडीजचे प्रा. जॉन एल कोमारॉफ यांच्याविरुद्ध अनेक हॉर्वर्ड प्राध्यापकांनी खुल्या पत्रावर स्वाक्षरी करून डॉ.गे यांना पाठवले होते.

हाॅवर्ड विद्यापीठाची स्थापना १६३६ मध्ये झाली. याच्या सुमारे ३८६ वर्षांनंतर प्रथमच एखादी कृष्णवर्णीय महिलेची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. क्लॉडीन यांची हॉर्वर्डच्या ३० व्या अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. यासोबत त्या असा सन्मान मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. गे युनिव्हर्सिटीत एक डीन आणि डेमोक्रॅसी स्कॉलर आहेत. मात्र, अध्यक्ष म्हणून त्या जुलै २०२३ मध्ये पदभार स्वीकारतील. त्या लॉरेन्स बेको यांची जागा घेतील. बेको कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी पद सोडत आहेत. २००१ ते २०१२ पर्यंत ब्राऊन युनिव्हर्सिटीचे नेतृत्व करणाऱ्या रूथ सिमन्स यांच्यानंतर गे आइव्ही लीगमध्ये एकमेक ब्लॅक प्रेसिडेंट आणि दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला असतील.

५२ वर्षीय डॉक्टर गे २००६ पासून हॉर्वर्डमध्ये आफ्रिकन आणि आफ्रिकन-अमेरिकन स्टडीजच्या प्राध्यापक आहेत. याआधी डॉ.गे स्टॅनफोर्ड विदय्ापीठात राज्यशास्त्राच्या सहायक आणि सहयोगी प्राध्यापक होत्या. येथे त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली.त्या १९९८ मध्ये हॉर्वर्डमधून डॉक्टरेट झाल्या. त्या फिलिप्स अॅक्सेटर अॅकॅडमीतून १९८८ मध्ये पदवीधर झाल्या.असमानतेच्या मुद्दयांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध गे अमेरिकी राजकीय भागीदारीच्या मुद्दयावर आवाज मानल्या जातात. त्या हार्वर्डच्या असमानतेच्या संस्थापक अध्यक्षही आहे.

बातम्या आणखी आहेत...