आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराची:पाकिस्तानात प्रथमच एक हिंदू मुलगी झाली असिस्टंट कमिश्नर, पेशानेआहे MBBS डॉक्टर

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारी देश पाकिस्तानमध्ये प्रथमच एक हिंदू मुलगी असिस्टंट कमिश्नर बनली आहे. या हिंदू मुलीचे नाव सना रामचंद असे आहे. हे स्थान मिळविण्यासाठी सनाला सेंट्रल सुपीरियर सर्व्हिस (CSS) परीक्षा उत्तीर्ण करावी लागली. यानंतर तिची निवड पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (PAS) झाली. ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी प्रशासकीय परीक्षा आहे. सना पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहे.

CSS च्या लेखी परीक्षेत 18,553 उमेदवार होते. त्यापैकी 221 उत्तीर्ण झाले. सना स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, 'मी खूप आनंदी आहे, पण आश्चर्य नाही. मला लहानपणापासूनच यशाची तीव्र इच्छा आहे आणि मला त्याची सवय झाली आहे. मी माझ्या शाळा, महाविद्यालय आणि FCPS परीक्षेतही अव्वल स्थान मिळवले आहे.'

सना सर्जनही होणार
सना सिंध प्रांतातील शिकारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने सिंध प्रांताच्या चांदका मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. सध्या ती सिंध इन्स्टिट्यूट ऑफ यूरोलॉजी अँड ट्रान्सपेरेंटकडून FCPS शिक्षण घेत आहे. ती लवकरच सर्जन बनणार आहे.

बातम्या आणखी आहेत...