आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत कोरोनाचा कहर थांबता थांबेना. एक मार्चनंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेत रोज दोन हजार मृत्यू होत असल्याने समोर आले आहे. टेक्सास आणि फ्लोरिडा ही सर्वाधिक प्रभावित राज्ये आहेत. येथे देशातील एकूण मृत्यूंच्या ३० टक्के मृत्यू होत आहेत. फ्लोरिडात ५६ टक्के लोकांना लस मिळाली. येथे दररोज ३५३ वर मृत्यू होत आहेत. टेक्सासमध्ये ५० टक्के लोकांना लस दिली गेली. येथे रोज सरासरी २८६ मृत्यू होत आहेत. लसीकरणानंतर करोना पीडित रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे , अमेरिकेत आतापर्यंत ५४ टक्के लोकांना लस टोचण्यात आली आहे.
सीडीसीच्या जीनोम सर्व्हिलन्सच्या संशोधनानुसार अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढीमागे डेल्टा व्हेरियंट आहे. अमेरिकेतील ९९ टक्के रुग्णांत हा व्हेरियंट आढळला आहे. कोरोना हॉट स्पॉटमध्ये निश्चित ट्रेंड दिसला नाही. कमी लसीकरण झालेल्या क्षेत्रांसह ६९% लसीकरण झालेल्या व्हेरमॉन्टमध्येही जास्त रुग्ण आढळत आहेत.
बूस्टरसाठी घाई करू नका : फाउची यांचे आवाहन
अमेरिकेतील प्रख्यात डॉ. एंथनी फाउची यांनी म्हटले की, लसीच्या बुस्टर डोससाठी घाई करू नये. दोन्ही डोस घेतल्यानंतरच बुस्टर डोस घ्यावा. अमेरिकी औषधी नियामक एफडीएच्या मते फायझर बायोएनटेकचा बुस्टर डोस ६५ वयांपुढील लोकांनाच दिला जावा.
सिंगापूर: रुग्ण वाढले
सिंगापुरात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे १ हजार रुग्ण नोंदवले गेल्याने सरकारने देशातील रुग्णालयांतील आयसीयू युनिटची माहिती जमवणे सुरू केले. यामुळे कोणत्याही स्थितीचा सामना करता येईल. संक्रमितांपैकी ०.२ लोकांनाच आयसीयूची गरज पडू शकते, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.