आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करच्या 94 वर्षांच्या इतिहासात प्रथमच...भारताला एकाच वेळी 2 पुरस्कार:नाटू-नाटू बेस्ट ओरिजिनल साँग, ‘एलिफंट व्हिस्परर्स’ सर्वाेत्कृष्ट लघुपट

लाॅस एंजलिस7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आरआरआर’च्या नाटू-नाटू गाण्यासाठी ऑस्करने गौरवलेले संगीतकार एम.एम. किरवानी (डाव्या बाजूला) आणि गीतकार चंद्रबोस. 

बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्म एलिफंट व्हिस्परर्सचे निर्माते गुनीत मोंगा व दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस (डाव्या बाजूस) यांना ऑस्करने गाैरवले गेले. - Divya Marathi
‘आरआरआर’च्या नाटू-नाटू गाण्यासाठी ऑस्करने गौरवलेले संगीतकार एम.एम. किरवानी (डाव्या बाजूला) आणि गीतकार चंद्रबोस. बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्म एलिफंट व्हिस्परर्सचे निर्माते गुनीत मोंगा व दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस (डाव्या बाजूस) यांना ऑस्करने गाैरवले गेले.

भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. लाॅस एंजलिस येथील डाॅल्बी थिएटरमध्ये आयाेजित ९५ व्या ऑस्कर्स अवाॅर्ड‌्समध्ये पहिल्यांदाच देशाच्या दाेन िचत्रपटांना ऑस्करने गाैरवण्यात आले. १५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या आरआरआरचे नाटू-नाटू गाणे सर्वाेत्कृष्ट गीत श्रेणीत निवडले गेले. ‘एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डाॅक्युमेंट्री शाॅर्टफिल्मच्या श्रेणीत ऑस्करने सन्मानित केले गेले. १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये ‘स्लमडाॅग मिलिअनर’च्या ‘जय हाे’ साठी ए.आर. रहमान यांना बेस्ट ओरिजिनल साँगचा ऑस्कर मिळाला हाेता. परंतु ताे ब्रिटिश चित्रपट हाेता. मलेशियन वंशाच्या मिशेल याेह ऑस्करमध्ये सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार संपादन करणाऱ्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या. नाटू-नाटू गाणे १० नाेव्हेंबर २०२१ राेजी प्रसारित झाले हाेते. प्रसारणाच्या केवळ चाेवीस तासांतच त्याला तामिळ आवृत्तीच्या यूट्यूबवर १.७ काेटी व्ह्यूज मिळाले हाेते. सर्व पाच भाषांत एकूण ३.५ व्ह्यूज हाेते. सर्वात आधी १० लाख लाइक्स मिळवणारे हे पहिले तेलुगू गाणे ठरले. तूर्त हिंदी आवृत्तीच्या यूट्यूबवर त्याला २६.५ काेटी व्ह्यूज व २५ लाख लाइक्स आहेत. ‘एलिफंट व्हिस्परर्स’ कळपातून भरकटलेल्या हत्तीचे पिलू ‘रघू’ आणि माहुतासाेबतची मानवी संवेदनांची कहाणी आहे. ऑस्कर साेहळ्यात दीपिका पदुकाेन प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली हाेती.

मेकिंग ऑफ नाटू-नाटू... ४ मिनिटे ३५ सेकंदांसाठी २० दिवसांचे चित्रीकरण; ४३ रिटेक, २० गाणी
*संगीतकार एमएम किरवानी यांनी गाण्याचा ९० टक्के भाग केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण केला हाेता.पण १० टक्के भाग पूर्ण करण्यासाठी १९ महिने लागले हाेते.
*दिग्दर्शक राजामाैली यांना ४ मिनिटे ३५ सेकंदांच्या चित्रीकरणास २० दिवस लागले. ४३ रिटेकनंतर पूर्ण झाले.
*गीतकार चंद्रबाेस यांनी आरआरआरसाठी २० गाणी लिहिली हाेती. पण पैकी नाटू-नाटूला फायनल केले.
*नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित यांना ते बसवण्यासाठी २ महिने लागले. ५० बॅॅकग्राउंड डान्सर, ४०० ज्युनियर आर्टिस्ट हाेते. गाण्याच्या हुक स्टेपसाठी ११० मूव्ह‌्ज.
* ऑगस्ट २०२१ मध्ये युक्रेनच्या कीव्ह येथे राष्ट्रपती झेलेन्स्कींचे घर मारिन्स्की पॅलेस येथे शूटिंग हाेते. १५ दिवसांत झालेल्या चित्रीकरणासाठी पूर्वाश्रमीचे कलाकार झेलेन्स्कींची परवानगी.

‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ...’ ला विक्रमी ७ पुरस्कार...
{सर्वाेत्कृष्ट चित्रपट, १२ मध्ये नामांकन,
{दिग्दर्शक- डेनियल क्वान, शेइनर्ट.
{सर्वाेत्कृष्ट अभिनेत्री- मिशेल याेह.
{सर्वाेत्कृष्ट सहअभिनेत्री- जेमी ली कार्टिस.
{सर्वाेत्कृष्ट सहअभिनेता- के. हुइ क्वान.
{लेखन- डॅनियल क्वान, शेइनर्ट.
{चित्रपट संपादन- पाॅल राॅजर्स
{अभिनेता- ब्रँडन फ्रासरक (व्हेल)
{बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स; कॅमेरूनच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ ने मिळवला.

बातम्या आणखी आहेत...