आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट:अमेरिकेमध्ये प्रथमच सहा भारतीय कॉल सेंटरवर फसवणुकीचा गुन्हा, वृद्ध नागरिकांना भीती-धमकी देऊन केली वसुली

न्यूयॉर्क / मोहंमद अली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कॉल सेंटरमधून अनेक अमेरिकन वयस्करांकडून सुमारे ४१ काेटी रुपयांची लूट केल्याच्या प्रकरणात अमेरिकेत पहिल्यांदाच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमेरिकेतील तपास संस्थांनी दीर्घ तपासानंतर भारतातील सहा कॉल सेंटरच्या विराेधात ही कारवाई केली. जाॅर्जियाचे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कर्ट एरस्काइन म्हणाले, भारतातील काॅल सेंटरवरून अमेरिकेतील बहुतांश वृद्धांना लक्ष्य करण्यात आले आहे. बनावट कॉल करून वृद्धांची आयुष्यभराची कमाई लुटण्यात आली आहे. बनावट राेबाेकाॅलमुळे सर्वकाही गमावणाऱ्या वृद्धांना मानसिक तणावातून जावे लागत आहे. अनेक वृद्धांच्या निवृत्तिवेतनाला सुरुंग लागला आहे. अनेक वेळा या वृद्धांना धमकावूनदेखील वसुली केली जात हाेती. २०१८ मध्ये अशा घटना समाेर आल्या हाेत्या. अॅटर्नी एरस्काइन म्हणाले, काॅल सेंटर फ्राॅडमुळे अनेक अमेरिकी नागरिकांच्या मनात भारतीयांबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे.

बीपीआेद्वारेदेखील असाच घाेटाळा
गाैरव गुप्ता यांच्या ई-संपर्क बीपीआेच्या माध्यमातूनदेखील अशाच प्रकारच्या फसवणुकीचे प्रकरण समाेर आले हाेते. आता मनू चावला यांची अचीव्हर्स साेल्युशन, सुशील सचदेवा यांची फिनटाॅक ग्लाेबल, दिनेश यांची ग्लाेबल, गजेसिंह यांची शिवाय लि., संकेत माेदींची टेक्नाेमाइन काॅल सेंटरच्या विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मचारी सांगून कराची मागणी करायचे
कॉल सेंटरमधून फाेन करणारे अमेरिकन शैलीतील इंग्लिश संभाषण करू शकत हाेते. त्यांचे फर्डे इंग्लिश एेकून पीडित त्यांच्या जाळ्यात अडकायचा. कॉलर स्वत:ची आेळख बँक कर्मचारी अशी सांगायचे. ते या नागरिकांकडे साेशल सेक्युरिटी काेड, कराचीदेखील मागणी करायचे. करस्वरूपात माेठी रक्कम न भरल्यास पीडित वृद्धाला कडक कारवाईची धमकीही दिली जायची.

व्हीआेआयपीने कॉलमुळे कॉल ट्रेसिंग कठीण
भारतीय कॉल सेंटरमधून अमेरिकेला करण्यात येणारा काॅल व्हीआेआयपीद्वारे केला जात हाेता. त्यामुळे सगळे काॅल फाॅरवर्ड हाेत असल्याने कॉल नेमका कुठून आला आहे याचा अंदाजही अमेरिकेतील पीडित व्यक्तीला येत नव्हता. म्हणजेच हा काॅल अमेरिकेतील आहे की अन्य देशातील हे त्यांना कळत नव्हते. त्यातूनच पीडित सहजपणे अकाउंट क्रमांक देत हाेते.

कर्ज देण्याचे आमिष दाखवून अकाउंटवर डल्ला
भारतातील कॉल सेंटरहून अमेरिकेत फाेन केला जात हाेता. त्यात कॉलर फायनान्स कंपनीकडून बाेलत असल्याची बतावणी करत आर्थिक मदतीची आॅफर द्यायचा. त्यानंतर कर्जफेडीची क्षमता सिद्ध करण्यासाठी कॉलर त्या नागरिकास काही शुल्क जमा करण्यास सांगे. त्यासाठी काॅलर पीडिताला बँक अकाउंट क्रमांक विचारत. हे संभाषण कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्यासारखे भासवणारे असायचे. पुढे वायर ट्रान्सफर किंवा गिफ्ट कार्डने रकमेला कॉलरद्वारे सांगितलेल्या खात्यावर जमा करण्याची सूचना दिली जायची. मग वायर ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्ण हाेताच पीडिताच्या खात्यातील सर्वच्या सर्व रक्कम साफ व्हायची. केवळ काही मिनिटांत ही लूट केली जायची.

बातम्या आणखी आहेत...