आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time In The World, A Baby's Brain Surgery Was Done In The Womb, Both Mother And Baby Are Healthy

ब्रेन सर्जरी:जगात पहिल्यांदा गर्भातच झाली बाळाच्या मेंदूची शस्त्रक्रिया, आई-बाळ दोघेही निरोगी

बाेस्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत एका महिलेच्या गर्भाशयात वाढत असलेल्या मुलीवर मेंदूची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करण्यात आली. गर्भातच ब्रेन सर्जरी होण्याचे हे जगातील पहिलेच प्रकरण असल्याचा दावा करण्यात येत आहे. १० डॉक्टरांच्या टीमने २ तास प्रयत्न करून डेनव्हर नावाच्या मुलीचा जीव वाचवण्यात यश मिळवले.

या दुर्धर आजाराला ‘व्हीनस ऑफ गॅलेन मालफॉर्मेशन’ या नावाने ओळखले जाते. यात मेंदूकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या नसांमध्ये समस्या निर्माण होतात. ही शस्त्रक्रिया बोस्टनच्या ब्रिघम हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.

डॉ. डॅरेन ओरबॅक म्हणाले, साधारणत: बाळांवर जन्मानंतर उपचार केले जातात. रक्तप्रवाह मंद करण्यासाठी छोट्या कॉइल टाकताना कॅथेटरचा वापर केला जातो. मात्र, उपचार नेहमी खूप उशिराने केला जातो. ही स्थिती असलेल्या सर्व बाळांपैकी ५० ते ६०% तत्काळ आजारी होतात. त्यांचा मृत्युदर ४०% असतो. जिवंत राहणारी अर्धी मुले गंभीर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा सामना करतात. सर्जरी केली नसती मेंदूत मोठी दुखापत झाली असती आणि लगेच बाळाते हृदय निकामी झाले असते. लुसियानातील दांपत्य डेरेक आणि केन्याटा कोलमन म्हणाले, आम्हाला ३० आठवड्यांत अल्ट्रासाउंडवेळी बाळाच्या आजाराबाबत कळले. आता आई-बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.