आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृत्रिमरीत्या तयार केलेले रक्त ही कल्पना कदाचित काही दिवसांपूर्वी एक स्वप्नच होते. मात्र, मानवाने आता त्या क्षेत्रातही एक पाऊल पुढे टाकले आहे. जगात प्रथमच प्रयोगशाळेत विकसित रक्त लोकांना देण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या क्लिनिकल ट्रायलअंतर्गत प्रयोगशाळेत विकसित रक्त माणसांना देण्यात आले. केम्ब्रिज व ब्रिस्टल विद्यापीठासह इतर संस्थांचे शास्त्रज्ञ या चाचणीत सहभागी झाले. स्टेम सेल्सद्वारे या ब्लड व्हेसल्स विकसित केल्या आहेत. प्रयोगात आणल्या जाणाऱ्या दुर्मिळ रक्तगटाचे रक्त विकसित करणे हे या संशोधनाचे उद्दिष्ट आहे. सिकलसेल, अॅनिमिया आदी स्थितींमध्ये नियमितपणे रक्त चढवण्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हे आवश्यक आहे. रक्ताचे नमुने योग्यरीत्या मेळ खात नसतील तर शरीर हे रक्त स्वीकार करत नाही आणि उपचार अपयशी ठरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.