आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरिया:जगात पहिल्यांदाच दक्षिण कोरियात सर्जरी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावले

दक्षिण कोरिया3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण कोरियात अॅनास्थेशियानंतर रुग्णांच्या उपचारात होणारी कथित बेपर्वाई रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅॅमेरे लावण्यात आले आहेत. शस्त्रक्रियेच्या खाेलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची अशा प्रकारची कारवाई जगात पहिल्यांदाच झाली आहे. गेल्या वर्षी दक्षिण कोरियाने कायद्यात दुरुस्ती करून यासंबंधी नवा कायदा आणला आहे.

बेपर्वाईमुळे जगात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट सेवेच्या देशाच्या लाैकिकाला काळिमा फासला जात आहे, असे दक्षिण कोरियाला वाटते. रुग्णालयांच्या विश्वासार्हतेलाही तडा जात होता. त्यामुळे सरकारने हा कायदा केला आहे. मेडिकल असो सिएशनने मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास विरोध दर्शवला आहे. कॅमेऱ्यामुळे डॉक्टरांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. रुग्ण कल्याणाचे कार्य करणारी एनजीओ गी-जाँगने हा कायदा स्वागतार्ह आहे, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...