आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • For The First Time In The World, DNA Screening Of Two And A Half Million People Was Done In Australia, Future Serious Diseases Will Be Known

दिव्‍य मराठी विशेष:जगात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात अडीच कोटी लोकसंख्येचे केले डीएनए स्क्रीनिंग, भविष्यातील गंभीर आजार कळणार

मेलबर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आपल्या पूर्ण लोकसंख्येचे डीएनए स्क्रीनिंग सरकारी खर्चाने करणार आहे. असे करणारा तो जगातील पहिलाच देश आहे. लोकांना निरोगी ठेवणे आणि वेळेवर उपचार बहाल करण्याच्या हेतूने हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.

सरकारचे मानणे असे की, लोकसंख्येच्या डीएनए सॅम्पलिंगमुळे येत्या काळात लोकांना कर्करोग, मधुमेह यासारखे आजार जडण्याची किती शक्यता आहे, याबाबत माहिती मिळू शकेल. हे डीएनए स्क्रीनिंग अतिशय महागडे आहे. ऑस्ट्रेलियात त्याची सुरुवात मेलबर्नच्या मोनाश विद्यापीठातून करण्यात आली. फ्री डीएनए टेस्टिंग प्रोजेक्टबाबत लोकांमध्ये अपार उत्साह पाहायला मिळत आहे. २४ तासांपेक्षा कमी वेळात पहिल्या टप्प्यात १८-४० वयोगटातील १० हजार लोकांनी डीएनए स्क्रीनिंगसाठी नोंदणी केली आहे. चाचणीनंतर लक्षात आले की, दर ७५ पैकी एकाला भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका आहे. चाचणीत गंभीर आजाराचे संकेत मिळत असल्याने अनेक लोक चिंतेत बुडाले. मोनाश विद्यापीठात या प्रोजेक्टचे नेतृत्त्व करणारे जेन टिल यांच्यानुसार, चाचणीत गंभीर आजाराचा धोका स्पष्ट झाल्याने लोक चिंतेत आहेत, मात्र त्यामुळे आजारावर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. सरकारकडून देखभालीसाठी उपाय करण्यात येतील. वेळेवर उपचार हा या प्रोजेक्टचा हेतू आहे.

स्क्रीनिंग डेटातून सरकार आरोग्य बजेट तयार करणार डीएनए स्क्रीनिंगच्या डेटानुसार सरकार आरोग्य बजेट निश्चित करणार आहे. जाणकारांचे म्हणणे असे की, सध्या आजार झाल्यानंतर लोकांना कळते. डीएनए स्क्रीनिंगच्या डेटानुसार प्रत्येक वयोमानानुसार माहिती संकलित केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...