आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​रशिया - युक्रेन युध्‍द:युक्रेनमध्‍ये प्रथमच युद्धादरम्यान रिकामी होतील 8 लाख लोकसंख्येची 2 शहरे

मेगन स्पेसिया/ मॅथ्यू पाेक|कीव्ह11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने केलेल्या हल्ल्याच्या ९ महिन्यांनंतर युक्रेनमध्ये पहिल्यांदाच दोन मोठी शहरे पूर्णपणे रिकामी केली जात आहेत. यादरम्यान, ८ लाखांपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या शहरातून दुसऱ्या ठिकाणी हलवले जाईल. खेरसॉन आणि मायकोलायेव्ह शहरात मोठ्या बर्फवृष्टीचा सामना करणाऱ्या लोकांना वीज-पाणी न मिळाल्यामुळे युक्रेनने हा निर्णय घेतला आहे.

सोमवारी दोन्ही शहरांचे किमान तापमान उणे १ अंश सेल्सियसच्या खाली गेले. पाणी आणि वीज पुरवठा बंद झाल्याने येथे राहणे कठीण झाले आहे. खेरसॉनची लोकसंख्या ३ लाख आणि मायकोलायेव्हची सुमारे ५ लाख आहे.रशियन लष्कर खेरसॉनहून परतले आहे. मात्र, काळ्या समुद्रातून रशियन नौदल सतत खेरसॉन आणि मायकोलायेव्हवर बॉम्बवर्षाव करत आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील पाणीपुरवठा तसेच वीजपुरवठा ठप्प झाला आहे. वीज आणि पाणी टंचाईमुळे लोक त्रस्त आहेत.

खेरसॉनमधून ४७५ मुलांच्या पहिल्या गटास काढले युक्रेनने रविवारी जवळपास ४७५ मुलांच्या पहिल्या गटास खेरसॉनमधून काढले. अनेक महिन्यांच्या युद्धानंतर नुकतेच खेरसॉन सोडण्याआधी रशियाने येथील वीज आणि जलसंयंत्र नष्ट केले आहे. अशा स्थितीत येणाऱ्या कडाक्याच्या थंडीआधी युक्रेन लोकांना येथून बाहेर काढू इच्छित आहे.

बातम्या आणखी आहेत...