आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवी चाल:दाऊद कराचीत; पाकने प्रथमच दिली कबुली, आर्थिक निर्बंधांपासून वाचण्यासाठी 88 अतिरेकी संघटनांविरुद्ध कारवाईचे ढोंग

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लष्कराच्या मुख्यालयापासून 8 किमी दूर दाऊदचे वास्तव्य

२७ वर्षांत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याची कबुली अतिरेक्यांचे आश्रयस्थान पाकिस्तानने दिली आहे. दहशतवादाच्या फंडिंगवर नजर ठेवणारी संस्था एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर येण्यासाठी पाकने ८८ अतिरेकी संघटना व त्यांच्या म्होरक्यांवर कारवाईचे ढोंग केले आहे. याच यादीत दाऊदचे नाव आहे.

दाऊद हा कराचीतच असल्याचे भारताने सुरुवातीपासूनच म्हटले आहे. मात्र पाक नेहमीच त्याचा इन्कार करत आलेला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद व अतिरेकी मसूद अजहरचे नावही याच यादीत आहे. पाकिस्तानने अतिरेकी व त्यांच्या संघटनांची मालमत्तेची जप्ती व खाती सील करण्याचा आदेश दिला आहे. एफएटीएफने जून २०१८ मध्ये पाकला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला २०१९ पर्यंत कार्ययोजना लागू करायची होती. कोरोनामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली होती.

दाऊदची १४ नावे
जीव वाचवण्यासाठी दाऊदने १४ नावे वापरली आहेत. त्यात बडा सेठ, मुच्छड आणि हाजीसाहब अशी ९ उपनावे.
- मुंबईतून ६ पासपोर्ट : दाऊदने भारत, पाक, दुबई व जेद्दाह येथून १४ पासपोर्ट घेतलेले आहेत. यातील ६ एकट्या मुंबईतून देण्यात आले होते.

- १९९३ च्या मुंबईतील १३ बॉम्बस्फोटांत दाऊद मुख्य दोषी असून तो मोस्ट वाँटेड आहे. या हल्ल्यात ३५० लोक मारले गेले होते. २००३ मध्ये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते.

- लष्करी क्षेत्रात घर : पाकमधील अनेक स्थळांपैकी दाऊदचे कराचीतील तीनच पत्ते सांगण्यात आले. पहिला सैनिकांसाठी असलेल्या गृहयोजनेतील ३७१ क्रमांकाचे घर, दुसरे क्लिफ्टनमध्ये व्हाइट हाऊस आणि तिसरे नुराबाद भागात असलेला प्रशस्त बंगला.