आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौदी अरब स्थित मुस्लिमांच्या पवित्र धर्मस्थळ मक्का येथून ब्लॅक स्टोनची छायाचित्रे समोर आली आहेत. सौदी प्रशासनाने प्रथमच ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अरबी भाषेत या काळ्या दगडाला अल-हजर अल-अस्वाद म्हणतात. याचा अर्थ सियाह किंवा काळा दगड आहे. ही छायाचित्रे खास कॅमेऱ्याने काढली आहेत. 49 हजार मेगापिक्सेलची ही छायाचित्रे डेव्हलप करण्यास सुमारे 50 तास लागले.
अभियांत्रिकी एजन्सीने मिशन पूर्ण केले
यासाठी मशीद प्रशासनाने आपल्या अभियांत्रिकी एजन्सीची मदत घेतली. यावेळी 1050 छायाचित्रे घेतली गेली. यासाठी एकूण 7 तास लागले आणि फोकस स्टॅकिंग (focus stacking) तंत्रज्ञान वापरले गेले. यातून वेगवेगळ्या अँगलने काढलेली छायाचित्रे एकत्र केली जातात आणि त्यानंतर यामधून एक शार्प आणि उच्च प्रतीचे छायाचित्र तयार केले जाते.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या इस्लामिक स्टडीजच्या संशोधक आफिती अल-अकिती यांच्यानुसार - हा दगड वास्तवात काळा नाही, जसे मी आजपर्यंत तसे समजत होतो. पहिल्यांदाच या दगडाचे फोटो मॅग्निफाय करून घेण्यात आले आहेत. आता हे फोटो तुम्ही अत्यंत बारकाईने आणि निरक्षणपूर्वक पाहू शकता.
हा दगड पांढरा होता का?
अमेरिकन चॅनेल CNNशी झालेल्या संभाषणात इस्लामिक स्टडीज संशोधक आफिती अल-अकीती म्हणतात - मला वाटते की हा दगड यापूर्वी पांढरा असावा. असे मानले जाऊ शकते की मोठ्या संख्येने लोकांनी स्पर्श केल्यामुळे रंग काळा झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.