आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापती-पत्नीचे नाते सर्वात घट्ट असते. दोघांचे सूर चांगले जुळलेले असतात आणि प्रेम एकमेकांना सर्व समस्यांपासून दूर ठेवते. डेन्मार्कच्या संशोधकांनुसार, जर यातील एखाद्याने साथ सोडली तर दुसऱ्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वैद्यकशास्त्राच्या भाषेत या स्थितीला ‘विडोहूड इफेक्ट’ म्हटले जाते. एकट्या पडलेल्या सहकाऱ्याला जगण्यात अडचणी येतात.
कुणावर या परिणामाचा किती धोका होतो, यावर संशोधकांचे म्हणणे आहे, की ते धर्म, वंश आदी बाबींवर अवलंबून असते. इतकेच नव्हे तर जोडीदाराच्या मृत्यूच्या कारणावरही अवलंबून असते. मात्र घट्ट भावनात्मक बंध असलेल्या जोडप्यांवर याचा परिणाम अधिक होतो. डेन्मार्क, ब्रिटन आणि सिंगापूर येथील संशोधकांनी ६ वर्षे ते ६५ पेक्षा अधिक वयाच्या १० लाख डेनिस नागरिकांच्या डेटाचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. संशोधकांना असेही आढळून आले आहे, की एखाद्या पुरुषाने आपला जोडीदार गमावला तर त्याच्या वयाच्या जोडप्यांच्या तुलनेत एक वर्षाच्या आत त्याच्या मृत्यूचा धोका ७०% वाढतो. महिलांच्या बाबतीत ही जोखीम २७% आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, जास्त वयाच्या ज्येष्ठांच्या तुलनेत कमी वयाच्या ज्येष्ठांमध्ये हा धोका सर्वाधिक आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीचे हेल्थ अँड इनइक्वॅलिटीज प्रोग्रामचे सहसंचालक डॉन केर सांगतात, जोडपी नेहमी आपल्या जीवनशैलीशी संबंधित अडचणी आणि आवश्यक बाबी एकमेकांना सांगतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. अभ्यासाची मोठी व्याप्ती आणि सहा वर्षांच्या दीर्घ कालावधीमुळे संशोधक वैधव्याच्या परिणामांच्या महत्त्वाच्या घटकांपर्यंंत पोहोचू शकले. यात सर्वाधिक परिणामकारक रिस्क फॅक्टर लिंग आणि वय आहे. हे आश्चर्यकारक आहे, कारण दैनंदिन जीवनात आपण अशी कल्पना करू शकत नाही. उटाह युनिव्हर्सिटीत जेरोन्टोलॉजी इंटरडिसिप्लिनरी प्रोग्रामचेे सहायक अधिष्ठाता कारा डासेल सांगतात की हे आश्चर्यजनक की कमी वयाच्या लोकांमध्ये हा धोका अधिक आहे. कमी वयात जोडीदाराला गमावणे हे असामान्य असते, हे त्यामागचे कारण असू शकते. या धक्क्यामुळे तणाव आणि एकटेपणा येतो. अशा प्रकारचे सर्व कारक जीवनाची जोखीम वाढवतात.
वृद्धावस्थेप्रमाणे वैधव्याच्या परिणामांवर काम करण्याच्या गरजेवर भर : संशोधकांनी अभ्यासात जोडीदाराला अवेळी गमावण्याच्या आधी आणि नंतर आरोग्यावर होणाऱ्या खर्चाचेही विश्लेषण केले आहे. तज्ञ सांगतात, की कमी वयाच्या ज्येष्ठांसाठी अशक्तपणा हा मोठा धोका आहे. डॉन केर म्हणतात, सर्व वयोगटातील पुरुषांमधील एकटेपणा अकाली मृत्यूचा धोका वाढवतो. कमी वयात हे अधिक घातक असतो. याच्याकडे एक गंभीर इशारा म्हणून पाहिले पाहिजे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.