आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Lockdown | Corona | Forced Protests In Europe, 7 Injured In Police Firing In The Netherlands; The Anti lockdown Movement Hit Europe

लॉकडाऊनला विरोध:युरोपात सक्तीला विरोध, नेदरलँडमध्ये पोलिसांचा गोळीबार 7 जखमी; लॉकडाऊनविरोधी आंदोलनाच्या युरोपला झळा

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रिया लस अनिवार्य करणारा पहिला युरोपीय देश, जर्मनीत कोरोनाने मोडले विक्रम

युरोपात कोविड परतल्यानंतर लस घेण्यासाठी सक्ती केल्यामुळे विरोध वाढू लागला आहे. फ्रान्स, ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंडमध्ये निदर्शने सुरू आहेत. शांतताप्रिय देश नेदरलँडमध्ये दंगलखोरांनी रॉटरडॅमच्या मार्गावर जाळपोळ केली आणि पोलिस अधिकाऱ्यांवर हल्लाही केला. पोलिसांना गोळीबार करावा लागला.

हिंसाचारात सात लोक जखमी झाले. त्यापैकी दोन जणांना गोळी लागली. युरोप कोरोना संसर्गाचे मोठे केंद्र होण्याच्या मार्गावर असल्याने लॉकडाऊन, अनिवार्य लसीकरण इत्यादी कडक नियम लागू केले जात आहेत. त्याचबरोबर लस न घेणाऱ्यांवर सक्ती केली जात आहे. त्यांच्या प्रवासावर मर्यादा घातल्या जात आहेत. नेदरलँडने रुग्णसंख्या वाढत असल्याने अंशत: लॉकडाऊन लागू केला. संपूर्ण युरोपात लस न घेणाऱ्यांवर निर्बंध लागू केले जात आहेत.

ऑस्ट्रिया : उद्यापासून देशभर लॉकडाऊन
ऑस्ट्रिया लस अनिवार्य करणारा पहिला युरोपीय देश बनला. सोमवारपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. व्हिएन्नामध्ये निदर्शने झाली.. चोवीस तासांत १५ हजार रुग्ण आढळून आले. एक तृतीयांश लोकसंख्येचे लसीकरण झालेले नाही. अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येत ३० % वाढ रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. १४ दिवसांत ही वाढ झाली. २४ तासांत ९३ हजार १९६ रुग्ण आढळले. ११३४ जणांना प्राण गमवावे लागले.

लस घेतली नसल्याने रोज तपासणी
जर्मनीत संसर्गाने सर्व विक्रम मोडले. ७९ टक्के वयस्कर लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. हा लसीकरण दर युरोपात सर्वात कमी आहे. लस न घेणाऱ्यांना कार्यालय असो की सार्वजनिक वाहतुकीदरम्यान दररोज तपासणी करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...