आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Foreign Minister S Jaishankar Vs Pakistan Bilawal Bhutto, UNSC Meeting Kashmir Terrorism Issue Updates

लादेनचे आदरातिथ्य करणाऱ्यांनी उपदेश देऊ नये:पाकिस्तानने UNमध्ये मांडला काश्मीरचा मुद्दा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिले उत्तर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयशंकर मंगळवारी 13 डिसेंबर रोजी रात्री उशिरा UNSC बैठकीला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क, USA येथे पोहोचले. ते गुरुवारी भारतात परतणार आहेत.

संयुक्त राष्ट्रात काश्मीरवर पाकिस्तानच्या टिप्पणीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्याच व्यासपीठावर प्रतिक्रिया दिली आहे. एस. जयशंकर म्हणाले की, ज्या देशाने ओसामा बिन लादेनचे आदरातिथ्य केले, ज्याने आपल्या शेजाऱ्याच्या संसदेवर हल्ला केला... ते यूएनसारख्या शक्तिशाली व्यासपीठावर उपदेश देण्याच्या लायकीचे नाहीत.

जयशंकर मंगळवारी संयुक्त राष्ट्रात पोहोचले, जेथे सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली काउंटर टेररिझम आणि रिफॉर्म्ड मल्टिलेटरिझम (बहुपक्षवाद) हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी सदस्या रुचिरा कंबोज यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिलेटरिझमवर चर्चा झाली. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.

पाकिस्तानसह चीनवरही वक्तव्य- काही लोक दहशतवाद्यांना योग्य ठरवत आहेत

1. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचांचा गैरवापर होतोय

जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर निशाणा साधला. म्हणाले, "साहजिकच आज आपण मल्टिलेटरिझममध्ये सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आपला स्वतःचा दृष्टिकोन असू शकतो, पण एक सामान्य मत तयार होत आहे, किमान यात आपण फारसा विलंब करू नये. दहशतवादाविरुद्ध जग संघर्ष करत आहे आणि अशा काळात काही लोक गुन्हेगारांना, दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाऱ्यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय मंचांचा गैरवापर करत आहेत."

2. संघर्ष आणि हिंसाचाराच्या परिस्थितीत गांधींचे आदर्श आजही गरजेचे

ते म्हणाले, "जग आणीबाणी, युद्धे आणि हिंसाचारातून जात आहे, संघर्ष करत आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी महात्मा गांधींच्या आदर्शांची अजूनही गरज आहे. साथीचे रोग, हवामान बदल, संघर्षांच्या आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यावर संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता आहे. यूएन कार्यालयात गांधी पुतळ्याच्या अनावरणानंतर एस. जयशंकर यांनी हे वक्तव्य केले.

संयुक्त राष्ट्र कार्यालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर.
संयुक्त राष्ट्र कार्यालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर.

3. आव्हानांचे नॉर्मलायझेशन स्वीकारले जाऊ नये

भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "आपण मार्ग शोधत आहोत, मग अशा धोक्यांना नॉर्मल करण्याच्या प्रयत्नांना आपण स्वीकारू नये. आजपर्यंत असा प्रश्न उद्भवला नाही की संपूर्ण जग जे स्वीकारत नाही, ते समर्थन करण्याचा प्रयत्न का केला जात आहे. सीमेपलीकडील दहशतवादाला, जे दहशतवादाला प्रोत्साहन देतात त्याला हेदेखील लागू होते."

4. व्यवस्थेत बदल करण्याची मागणी वेगाने वाढत आहे

ते म्हणाले, "आम्ही 75 वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या बहुपक्षीय संस्थांच्या परिणामकारकतेवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यांच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. अलिकडच्या वर्षांत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरील वाढत्या तणावाने बदलाची मागणी जोर धरत आहे. जेव्हा क्लायमेट जस्टिस आणि क्लायमेट अॅक्शनचा प्रश्न येतो तेव्हा गोष्टी काही चांगल्या नसतात. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, आम्ही लक्ष विचलित करण्याचे आणि गोंधळात टाकण्याचे प्रयत्न पाहिले आहेत."

बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर.
बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर.

काश्मीरवर बिलावल म्हणाले होते- तुम्ही शांतता प्रस्थापित करू शकता हे सिद्ध करा

भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्याच्या मागणीदरम्यान बिलावल भुट्टो म्हणाले होते- काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. जर तुम्हाला (भारत) बहुपक्षीयतेचे यश पाहायचे असेल, तर तुम्ही काश्मीर प्रश्नावर UNSC ठरावाच्या अंमलबजावणीला परवानगी देऊ शकता. बहुपक्षवाद यशस्वी होईल हे तुम्ही सिद्ध करू शकता. तुमच्या (भारताच्या) अध्यक्षतेखाली UNSC आमच्या प्रदेशात (काश्मीर) शांतता प्रस्थापित होऊ शकते, हे तुम्ही सिद्ध करा.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो संयुक्त राष्ट्रात चर्चेदरम्यान.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो संयुक्त राष्ट्रात चर्चेदरम्यान.

डिसेंबरमध्ये भारताला UNCS मध्ये दोन वर्षे पूर्ण

या वर्षाच्या डिसेंबरअखेरीस भारत 15 सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNCS) निवडून आलेला सदस्य म्हणून दोन वर्षे पूर्ण करेल. याआधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मंगळवारी दोन दहशतवाद विरोधी बैठकांच्या अध्यक्षतेसाठी संयुक्त राष्ट्रात पोहोचले.

भारताने 1 डिसेंबर रोजी सुरक्षा परिषदेचे मासिक फिरते अध्यक्षपद स्वीकारले होते. ऑगस्ट 2021 नंतर, भारत UNCS सदस्य म्हणून दोन वर्षांच्या कार्यकाळात परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची ही दुसरी वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...