आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रशिया:तीन देशांतील जंगलांत धग.. : शहरांपर्यंत वणव्याचे लोळ, 3 लाख लोकांना फटका

क्रास्नोयॉर्स्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियात यंदा वणव्याच्या आगीत ग्रीसएवढा भाग खाक
  • 99 हजार एकर वन क्षेत्रात 197 ठिकाणी आग

जगातील सर्वात थंड ठिकाण म्हणून परिचित सैबेरियाच्या जंगलांत वणवा पसरत चालला आहे. पूर्व रशियातील सर्वात मोठ्या भागावर आग लागल्याचे दिसून येते. आता याकुत्सक, युगोरस्क, सोवेत्सरी इत्यादी छोट्या गावांनाही आगीचा वेढा आहे. रशियाच्या वनसंरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार ९९ हजार एकर क्षेत्रात १९७ जागी आग पसरलेली िदसते. ५ हजारांहून जास्त लोकांना त्याचा फटका बसला आहे. रशियात ग्रीनपीसच्या वणव्यासंबंधी अभ्यास विभागाचे प्रमुख ग्रेगोरी कुक्सिन म्हणाले, सैबेरियाची उष्णता प्रचंड वाढू लागली आहे. त्यामुळेच त्यास तत्काळ रोखणे गरजेचे आहे. वर्षभरात येथील ग्रीसएवढे क्षेत्रफळातील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

कॅलिफॉर्नियात पुन्हा आग : 

लॅसेन भागातील ५८०० एकर वनक्षेत्रात पुन्हा आगीचे साम्राज्य पसरले. त्यामुळे वणव्यामुळे सुमारे ३० हजार लोकांना हलवले. २४ तासांत ८५० एकर जंगल खाक झाले.